पुणे

पुरंदर तालुक्यात अवैध सावकारीचा पहिला गुन्हा दाखल

दत्ता भोंगळे

गराडे : पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व भोर-पुरंदर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांनी मागील महिन्यात कार्यभार स्विकारल्यानंतर जिल्ह्यातील अवैध सावकारी विरोधात मोहीम राबवण्याचे सुतोवाच केले होते. त्याला पुरंदर तालुक्यात बुधवार (ता. २३) रोजी सुरवात झाली.

दिवे (ता. पुरंदर) येथे उसने दिलेल्या पैशाच्या बदल्यात जादा रक्कमेची मागणी करुन दमदाटी करत जमीन बळकवण्याची तक्रार दाखल करण्यात आली. त्यामुळे पुंरदर तालुक्यात सावकारकीचा पहिला गुन्हा दाखल झाला आहे.

सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शंकर सोपान टिळेकर (वय ४५) धंदा ः शेती, (रा. दिवे, भापकरमळा, जुना जेजूरी रोड ता. पुरंदर) यांनी तक्रार दाखल केली आहे. दिवे येथीलच रहिवासी मारूती रामचंद्र औताडे याने मागील नोव्हेंबर २०१९ पासून ते (२१/१२/२०२० रोजीपर्यंत) त्याचेकडे सावकारकी करण्याचे लायसन्स नसताना फिर्यादी यांना उसने दिलेले १० लाख रूपयाच्या मोबदल्यात फिर्यादी यांची जमीन गट नं. १५६ मधील १५ गुंठ्ठे जमीन ( किंमत ५७,००,००० ) रूपयेची खरेदी करून घेतली व परस्पर जमीन लहूजी गंगाराम भापकर यांना विक्री केली आहे.

जमीन परत मागितली असता दमदाटी व व्याजासह ५५ लाख रूपयांची मागणी केली. म्हणून फिर्यादी शंकर सोपान टिळेकर यांनी मारूती रामचंद्र औताडे यांच्या विरूध्द पोलिसांनी महाराष्ट्र अधिनियम सावकारी कलम ३९, ४३,४५,२४,३१ याप्रमाणे तक्रार दाखल केली आहे. भोर-पुरंदरचे उपविभागीय पोलीस अधिकारी धंनजय पाटील यांच्या कार्यालयात फिर्यादी यांनी सर्व हकीकत व माहिती दिल्यानंतर सासवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप काम करत आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आमच्या चालू असलेल्या सावकारी विरोधात मोहीमेअंतर्गत आमच्या ऑफिसला येवून फिर्यादीने सर्व प्रकाराची माहिती दिली होती. त्याची खात्री करुन आज पुंरदर तालुक्यात सावकारकीचा पहिला गुन्हा दाखल झालेला आहे. तरी अशा प्रकारे सावकारीच्या संदर्भाने कोणताही त्रास होत असेल तर आम्हाला संर्पक करा व त्याची माहीती द्या. माहितीची खात्री करुन त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.-धंनजय पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT