First court for the disabled in Pune 
पुणे

दिव्यांगांसाठी पहिले न्यायालय पुण्यात

सकाळ वृत्तसेवा

पुणे- दिव्यांगांच्या दाव्यांचा निपटारा करण्यासाठी राज्यातील पहिल्या विशेष न्यायालयाची स्थापना पुण्यात करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांचे दावेदेखील या न्यायालयात चालविले जाणार आहेत. त्यामुळे या दोन्ही घटकांना जलद न्याय मिळणे सोपे होणार आहे. 

जिल्हा न्यायालयातील जुन्या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या या न्यायालयात एच. आर. वाघमारे यांची न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. राज्यातील अकरा शहरांत दिव्यांग आणि ज्येष्ठांसाठी विशेष न्यायालय सुरू करण्याची तरतूद करण्यात आली आहे. दीड वर्षांच्या पाठपुराव्यानंतर अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीचे न्यायालयात जागतिक अपंग दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झाले. या मागणीचा पाठपुरावा कल्याण येथील रहिवासी शंकर साळवे करत होते. 

दीड वर्षांपूर्वी केंद्रीय न्याय विधीमंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र न्यायालय सुरू करण्याची सूचना दिली होती. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांची एक बैठक पार पडली. त्यात राज्यातील अशा प्रकारचे स्वतंत्र न्यायालय सुरू करण्याची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. 

दिव्यांगासाठीच्या कायद्यात २०१६ मध्ये काही तरतुदी करण्यात आल्या होत्या. अधिसूचनेत मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सातारा, सांगली, लातूर, परभणी, नागपूर येथील न्यायालयात विशेष न्यायालय सुरू करण्याचे नमूद करण्यात आले होते. अधिसूचना जारी झाल्यानंतर दिव्यांग अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष न्यायालयाचे कामकाज सुरू झाले नव्हते, असे साळवे यांनी सांगितले.

दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक समाजातील घटक आहेत. बऱ्याचदा त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येते. मी आणि माझी पत्नी दिव्यांग आहोत. एका प्रकरणात आम्ही अपंग कल्याण आयुक्तालयाकडे दाद मागितली होती. तेव्हा हे प्रकरण न्यायालयीन कक्षेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर दिव्यांगांसाठी विशेष न्यायालय नसल्याची बाब माझ्या निदर्शनास आली होती. त्यामुळे दिव्यांगांसाठी स्वतंत्र न्यायालय राज्यात असणे गरजेचे असल्याने मी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केला.
- शंकर साळवे, नागरिक

सहा महिन्यांत निकालाची तरतूद 
विशेष न्यायालयात ये-जा करण्यासाठी स्वतंत्र मार्ग (रॅम्प) असावा. तक्रार दाखल झाल्यानंतर सहा महिन्यांत निकाल देण्यात यावा, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले होते. पुण्यात एकटे राहत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यांना या न्यायालयाचा फायदा होणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT