first day of the remove loudspeaker police issued notices 234 MNS members and arrested 58 pune  sakal
पुणे

भोंगाप्रकरणी पहिल्याच दिवशी पोलिसांकडून मनसेच्या 234 जणांना नोटीस 58 जण ताब्यात

मशिदींभोवती कडेकोट बंदोबस्त, शहरात अनुचित घटना नाही

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे चार एप्रिलपर्यंत उतरविण्याबाबत दिलेल्या आदेशानंतर बुधवारी शहरामध्ये तीन ते चार ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. पोलिसांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी 292 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यापैकी 58 जणांना ताब्यात घेऊन सोडून दिले, तर 234 जणांना प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी बुधवारी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवल्याने कुठलीही अनुचित घटना घडली नाही.

ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे चार एप्रिलपर्यंत न उतरविल्यास तेथे हनुमान चालिसा पठण करा, असा इशारा दिला होता. या पार्श्‍वभुमीवर रमजान ईदपासूनच शहरात पुणे पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विशेषतः पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही, यादृष्टीने बैठका घेऊन संबंधितांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार, मंगळवारपासूनच मनसेच्या असंख्य कार्यकर्त्यांना पोलिसांनी कलम 149 अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावली होती. त्याचबरोबर मंगळवारपासूनच शहरात सगळीकडे कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर राज ठाकरे यांच्या इशाऱ्याच्या पार्श्‍वभुमीवर बुधवारी पहाटेपासूनच तीन ते साडे तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दरम्यान, विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत नारायण पेठेतील खालकर चौकामध्ये मनसेने महाआरतीचा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मनसेचे अजय शिंदे यांच्यासह अकरा जणांना ताब्यात घेऊन सोडून दिले. त्याचबरोबर अलंकार पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये करिश्‍मा चौकातल हेमंत संभुस यांच्यासह 10 ते 12 जणांना, फरासखाना पोलिसांनी रविवार पेठेतील बंदिवान हनुमान मंदिर येथे प्रशांत कनोजीया यांच्यासह 4 जणांना, वारजे माळवाडी येथे कैलास दांगट यांच्यासह 10 जणांना, तर कोंढवा येथे मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या निवासस्थानासमोर अमोल शिरस, रोहन गायकवाड, अमित जगताप व गणेश बाबर यांना ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

"शहरातील परिस्थिती नेहमीप्रमाणेच सुरळीत आहे. शहरात बुधवारी कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. आवश्‍यक त्या व्यक्तींना नोटीस दिली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठीच्या उपाययोजना केल्या आहेत. बुधवारी सकाळी लाऊडस्पिकर वर अजान झालेली नाही. शहरात कोणी ठरवून अनुचित प्रकार घडवू इच्छित असेल, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.''

- अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

Indira Ekadashi 2025: पूर्वजांना मुक्त करण्यासाठी महिलांनी काय करू नये, जाणून घ्या नियम

Latest Marathi News Updates : परतीच्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ, मुंबईतील धरणांत ९८.८२ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT