mngl.jpg 
पुणे

पुण्यात साकारतेय पहिले एमएनजीएल भवन, काय आहे याोजना पाहा...

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या वतीने निर्माण करण्यात
येत असलेल्या पुणे शहरातील पहिल्या एमएनजीएल भवन या मुख्य कार्यालयाचा भूमीपूजन समारंभ येत्या शनिवारी आयोजित करण्यात आला आहे.

दरम्यान, बालेवाडीतील साई चौक येथे हे भव्य कार्यालय उभारले जाणार आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते हे भूमीपूजन होणार असल्याचे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सुप्रियो हलदर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी एमएनजीएलचे स्वतंत्र संचालक राजेश पांडे, वाणिज्यिक संचालक संतोष सोनटक्के, चीफ जनरल मॅनेजर प्रोजेक्‍ट शत्रुंजय सिंग, जनरल मॅनेजर मार्केटींग सुजित रुईकर, बिझनेस डेव्हलपमेंट प्रमुख अमोल हट्टी उपस्थित होते. याच दिवशी सीएनजी स्टेशन वास्तूचे देखील भूमीपूजन होणार आहे. खासदार गिरीश बापट, आमदार चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ढोरे यावेळी उपस्थित राहणार आहेत.

सोनटक्के म्हणाले, ``बालेवाडी येथे बांधण्यात येणारे एमएनजीएल भवन हे पुण्यातील पहिले एमएनजीएल भवन आणि मुख्य कार्यालय असणार आहे. महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सिंधुदुर्ग, धुळे या चार जिल्ह्यांसह कर्नाटकातील रामनगर या विभागाचे काम या भवनातून होणार आहे. पर्यावरणपूरक आणि भरपूर नैसर्गिक प्रकाश हे या भवनाचे वैशिष्ट्य आहे. रिड्यूस, रिसायकल आणि रियूज या तत्त्वांवर हे भवन उभे करण्यात येत आहे.``

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Charge: UPI पेमेंटवर चार्ज लागू झाला तरी हे 6 UPI व्यवहार फ्री! एक रुपयाही चार्ज नाही; जाणून घ्या कोणते

IND vs PAK Asian Games : श्रेयस अय्यरचा संघ आशियाई स्पर्धेत पाकिस्तानला भिडणार? जाणून घ्या हा महामुकाबला केव्हा होणार

iPhone 18 Pro साठी पहाटेपासून ग्राहकांच्या लांब रांगा; कुठे मिळतो? किती EMI भरावा लागणार? जाणून घ्या

Marathi News Live Updates : शिरूरच्या आंबेडकर नगरमध्ये गोळीबार; दुचाकीवरून जात असलेल्या तरुणावर झाडल्या गोळ्या

Goat Farming Subsidy: शेळीपालनासाठी ६.८४ लाखांचे अनुदान; १०० शेळ्या, ५ बोकडांचा फार्म उभारण्याची संधी, कसा करायचा अर्ज?

SCROLL FOR NEXT