pcmc 
पुणे

पिंपरीत दिलासादायक बातमी; हाय रिस्क काॅन्टॅक्टमधील पहिला रुग्ण निगेटिव्ह

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - शहरातील कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 52 झाली आहे. मात्र, त्यातही एक दिलासादायक घटना शुक्रवारी सायंकाळी स्पष्ट झाली. कारण, हाय रिस्क काॅन्टॅक्टमधील एका रुग्णाचा 14 दिवसांच्या उपचारानंतरचा व त्यानंतरच्या 24 तासांनी घेतलेल्या नमुन्याचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे या रुग्णाला घरी सोडण्यात येणार आहे. मात्र, त्यांना पुढील चौदा दिवस होम क्वारनटाइनची सूचना दिली जाणार आहे. 

दिल्लीतील हाय रिस्क काॅन्टॅक्टमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील 23 जण आले होते.  त्यांच्या संपर्कातील पाच जणांसह 28 जणांच्या घशातील द्रवांचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी दोघांचे रिपोर्ट दोन एप्रिल रोजी 'पॉझिटीव्ह' आले होते. त्यातील एका रुग्णाचे 14 दिवसानंतरचेही रिपोर्ट गुरुवारी (ता. 16) पॉझिटीव्ह तर एकाचे निगेटिव्ह आले होते. काल निगेटिव्ह आलेल्या रुग्णाचे चोवीस तासांच्या अंतराने घेतलेल्या नमुन्याचा रिपोर्ट ही निगेटिव्ह आला आहे. शहराच्या दृष्टीने ही बाब समाधानकारक आहे. 

पुण्यातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 
 
दरम्यान, 10 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील 52 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 12 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यात आता आणखी एकाचा समावेश होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India-IndiGo नंतर Akasa Air कडूनही विमानभाड्यात वाढ; नवा फ्यूल सरचार्ज जाहीर, जाणून घ्या नवे दर...

BAN vs PAK : यांना चौकारही अडवता येत नाही... पाकिस्तानी चेंडूसकट सीमारेषेबाहेर... धाडकन आपटला, हॉस्पिटलमध्ये पोहोचला...

पोलीस आयुक्तांच्या पत्नीच्या पायाला काटा रुतला, डॉक्टर दारू पिऊन उपचारासाठी पोहोचला; नंतर जे घडलं त्यानं...

Latest Marathi News Live Update : गॅस कनेक्शन बंद करण्याची भीती दाखवत सायबर फसवणूक; वर्सोवा पोलिसांचा इशारा

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेचे नाव बदला! माजी आमदार दीपिका चव्हाण यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मोठी मागणी

SCROLL FOR NEXT