Marathon Sakal
पुणे

Baramati News : बारामतीत प्रथमच 42 कि.मी.ची फुल मॅरेथॉन होणार

निरोगी आयुष्याचा संदेश देत युवकांमध्ये मैदानाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने बारामती स्पोर्टस फाऊंडेशनच्या वतीने 26 नोव्हेंबर रोजी बारामती पॉवर मॅरेथॉनचे आयोजन.

मिलिंद संगई

बारामती - निरोगी आयुष्याचा संदेश देत युवकांमध्ये मैदानाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने बारामती स्पोर्टस फाऊंडेशनच्या वतीने 26 नोव्हेंबर रोजी बारामती पॉवर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष सतीश ननवरे यांनी दिली.

तालुक्याच्या ठिकाणी पूर्ण अंतराची म्हणजेच 42 कि.मी.ची मॅरेथॉन बारामती पॉवर मॅरेथॉनच्या माध्यमातून प्रथमच बारामतीत होणार आहे. वर्ल्ड ॲथलेटिक असोसिएशनच्या मान्यतेने ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे.

या मॅरेथॉनमध्ये 42, 21 व 10 कि.मी. अशा तीन प्रकारात मॅरेथॉन होणार असून इतरांसाठी पाच कि.मी.ची फन मॅरेथॉनही असेल. कॉम्रेड मॅरेथॉन सारख्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनसाठी पात्रता निकष म्हणून बारामती पॉवर मॅरेथॉन ग्राह्य धरली जाणार असल्याचेही सतीश ननवरे यांनी नमूद केले. या मुळे भारतभरातून व्यावसायिक मॅरेथॉनपटू देखील या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

मॅरेथॉनसाठी बारामतीच्या फ्लॅट ट्रॅकवरुन धावणे ही धावपटूंसाठी वेगळी संधी असेल, या मुळे सर्वोत्तम वेळेची नोंद त्यांना करता येणे शक्य होईल, या पार्श्वभूमीवर अधिकाधिक बारामतीकरांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

10 नोव्हेंबरपर्यंत या मॅरेथॉनसाठी नाव नोंदणीची अंतिम तारिख असून www.bpmorg.com या संकेतस्थळावर नावनोंदणी करता येईल. या स्पर्धेतील विजेत्यांसाठी विविध श्रेणीमध्ये मिळून तब्बल आठ लाख रुपयांची पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत. या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

Latest Marathi News Live Update : मुंबईत कंत्राटदाराचा सातवा बळी, सरकारची ८६ हजार कोटींची थकबाकी

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT