coronavirus pune
coronavirus pune 
पुणे

पुणेकरांनो ऐकलंत का? 10 महिन्यांनी कोरोनाबाबत पहिल्यांदाच मोठी बातमी

गजेंद्र बडे

पुणे - पुणेकरांसाठी मागील अकरा महिन्यांपासून जीवघेणा ठरलेल्या कोरोनाच्या बाबतीत शनिवारी (ता ६) दिलासादायक घटना घडली आहे. तब्बल अकरा महिन्यांनंतर शनिवारी दिवसभरात पहिल्यांदाच कोरोनाने एकही मृत्यू झाला नाही. यामुळे पुणेकरांच्या आज पुन्हा एकदा ३० मार्च २०२० च्या स्मृती जाग्या झाल्या आहेत.

पुणे शहरातील कोरोना रुग्णाचा पहिला मृत्यू हा ३० मार्चला झाला होता. गेल्या महिनाभरात दोन-तीन वेळा कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या १ झाली होती. पण एकचा आकडा शून्यावर केव्हा येणार, याची उत्कंठा शिगेला पोचली होती. राज्यातील पहिला कोरोना रुग्ण ९ मार्च २०२० रोजी पुणे शहरात सापडला होता. दरम्यान, २४ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले होते. 

पुणे शहरातील कोरोनावाढीचा वेग, त्यातील रोजचे नवे रूग्ण, त्यानंतर रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची वेळेत तपासणी करण्यास प्राधान्य दिले आहे. त्याचवेळी रूणांना वेळेत आणि नेमके उपचार दिले जात असल्याने मृत्यूचा धोका नाही. सध्या शहराचा मृत्यू दर २.४ टक्के  आहे. तो आता आणखी कमी होईल. 
- डाॅ. संजीव वावरे, 
प्रमुख, साथरोग नियंत्रण,पुणे महानगरपालिका

दरम्यान, आज दिवसभरात पुणे शहरात नवे १८० कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे शहरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता १ लाख ९२ हजार ९८२ झाली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ८६ हजार  ८०१ कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय ४ हजार ७७४ जणांचा मृत्यू झाला आहे. संदर्भ: स्थितीत शहरात १ हजार ४०७ सक्रिय (अॅक्टिव्ह) कोरोना रुग्ण आहेत. यापैकी ११२ जणांची प्रकृती गंभीर असून अन्य २१२ जण ऑक्सीजनवर आहेत. दरम्यान, दिवसभरात ३ हजार २३९ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तसेच आज २६५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Sakal Podcast : बीड पंकजा मुंडेंना अवघड जाणार? ते ‘मर्द’ला पराभवाचा ‘दर्द’च होत नाही

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

SCROLL FOR NEXT