For the first time Pise Gram Panchayat has been unopposed this year due to the initiative taken by the villagers and youth.jpg 
पुणे

साठ वर्ष जे झाले नाही ते यंदा घडले ; पिसे ग्रामपंचायतमध्ये प्रथमच बिनविरोध निवडणूक

दत्ता जाधव

माळशिरस (ता. पुरंदर) : ग्रामपंचायतीच्या स्थापनेस ६० वर्ष होऊन अनेक वेळा ग्रामस्थांनी प्रयत्न करूनही बिनविरोध होऊ न शकलेली पिसे ग्रामपंचायत प्रथमच ग्रामस्थ व तरुणांनी घेतलेल्या पुढाकाराने यंदा बिनविरोध झाली. ग्रामस्थांच्या एकीचे पुरंदरच्या पूर्व विभागात कौतुक होत आहे. 

पुण्याच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 
 

पिसे ग्रामपंचायत सन 1962 मध्ये स्थापन झाली. श्रीनाथ म्हस्कोबा हे जागृत देवस्थान व पीरबाबा मंदिर ही जागृत देवस्थान येथे असल्याने प्रत्येक वेळी निवडणुकीत चुरशीची वातावरण पाहायला मिळत होते. ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक वेळा ग्रामस्थांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही. अनेक वेळा प्रयत्न करून बिनविरोध न झालेली ग्रामपंचायत पिसे गावातील जेष्ठ, तरुण, युवक, महिलांनी एकत्र येत पुढाकार घेऊन बिनविरोध केली.

ग्रामस्थांचे श्रीनाथ, म्हस्कोबा व पीरबाबा देवस्थांवरती श्रद्धा असल्याने सर्वांनी एक मताने आपले उमेदवार निश्चित केले. त्यामुळे निश्चित केलेले सात अर्ज ठेऊन बिनविरोध ग्रामपंचायत करण्यात यश आले. यावेळी सर्व नवीन सदस्यांनी सांगितले की अत्यंत विश्वासाने आम्हा सर्वाना संधी दिली असून विकासासाठी  सर्वांनाबरोबर घेऊन सर्व तो परी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
 
वॉर्ड क्र १ मधून 1) रोहन नारायण मुळीक 2) सीमा संतोष मुळीक 3) द्वारकाबाई पांडुरंग मुळीक
वॉर्ड क्र २ 1) गणेश बाळासो सांगळे 2) शोभा नंदकुमार कुटे 
वॉर्ड क्र ३  1) पंडित गुलाबराव मुळीक ,2) दिलशाद सल्लाउद्दीन सय्यद याना संधी दिली आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT