First transgender candidate Natasha contesting from Chinchwad 
पुणे

Vidhan Sabha 2019 : चिंचवडमध्ये पहिल्यांदा तृतीयपंथी उमेदवार उतरणार रिंगणात

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा  2019 : पिंपरी : तृतीयपंथीयांच्या हक्‍कासाठी जनहित लोकशाही पक्षाकडून तृतीयपंथी उमेदवार नताशा उर्फ नितीश लोखंडे हे चिंचवड विधानसभा मतदार संघातून रिंगणात उतरले आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे संस्थापक अशोक आल्हाट, मावळमधून पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष चौधरी, भोसरीतून पक्षाचे कामगार प्रदेशाध्यक्ष विश्‍वास गजरमल हे निवडणूक लढविणार आहेत. 

या संदर्भात पक्षाने पत्रकार परिषदेत (ता. 23) माहिती दिली. या वेळी उमेदवार नताशा यांनी तृतीयपंथी उमेदवारांचे समाजातील वास्तव परिस्थिती सांगितली. त्या म्हणाल्या, "तृतीयपंथीयांना हक्कासाठी झगडावे लागते. कागदपत्रे असो, वाहन खरेदी, दाखले, कर्ज, नवीन व्यवसाय यासाठी त्यांना अडचणी येतात. उदरनिर्वाहासाठी आम्हाला सहानुभूती नाही तर समान दर्जा हवा. समाजातील ही स्थिती बदलण्यासाठी मी विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहे.'' 

शेतमालाला भाव, रोजगार, आरक्षण, महागाई अशा मुद्यांवर पक्ष निवडणूक लढविणार असल्याचे आल्हाट यांनी सांगितले. या वेळी प्रदेशाध्यक्ष विनोद मोरे, उपाध्यक्ष मिलिंद साळवी, चौधरी, बाळासाहेब पाटोळे, भगवान वैरागकर, पुणे ग्रामीण अध्यक्ष बाळासाहेब किरकुंडे, भोसरी उपाध्यक्ष गणेश मोरे आदी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भूकच गेली! मुंबईत प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर झुरळ, डॉक्टरने VIDEO शेअर करत तुकाराम मुंढेंना केलं टॅग

Palghar News : गणेश विसर्जनावेळी पालघरच्या सूर्या नदीत दुर्घटना; १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

SCROLL FOR NEXT