First water Discharged through the canal from the ChasKaman dam 
पुणे

चास-कमान धरणातून कालव्याव्दारे खरिपाचे पहिले आवर्तन सोडले; धरणात 'एवढा' पाणीसाठा

राजेंद्र लोथे

चास(पुणे) : खेड तालुक्यासह शिरूर तालुक्याचे नंदनवन करणाऱ्या चास-कमान धरणाचा पाणीसाठा 98.39 % ( 8.41 टीएमसी ) झाला असून चास-कमान धरण ( ता. खेड ) मधून कालव्याव्दारे खरिप हंगामासाठीचे पहिले आवर्तन शनिवार ता. 29 पासून सोडण्यास सुरूवात झाली असल्याची माहिती धरणाचे सहाय्यक अभियंता श्रेणी 1 प्रेमचंद शिंदे तसेच शाखा अभियंता उत्तम राऊत यांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

ऑगस्ट महिना निम्मा संपला तरी खेड तालुक्यासह चास-कमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने समाधानकारकपणे हजेरी लावली नव्हती त्यामुळे धरणातील पाणीसाठा कासव गतीने वाढत होता. मात्र, गेली काही दिवसांपासून भिमाशंकर खोऱ्यात संततधार पाऊस सुरू असल्याने चास-कमान धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ झाली त्यातच कळमोडी धरण भरल्याने या धरणाच्या सांडव्याव्दारे येणारे पाणी चास-कमान धरणाच्या जलाशयात येत असल्याने चास-कमान धरण वेगाने भरण्याच्या स्थितीत आहे. आज सद्य स्थितीत चास-कमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच असून धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

धरणात आज 98.39 % ( 8.41 टीएमसी )  एवढा पाणीसाठा झाला असून एक जुनपासून धरण परिसरात 577 मीमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. धरण शंभर टक्के भरण्याच्या स्थितीत असल्याने शनिवार (ता. 29) ला सकाळी 8.30 वाजता विद्युत विमोचकाव्दारे 250 क्युसेक्स वेगाने पाणी कालव्यात सोडण्यास सुरूवात झाली असून टप्याटप्याने ही वाढ 550 क्युसेक्सपर्यंत वाढविण्यात येणार आहे. पावसाच्या प्रमाणानुसार कालवा सुरू झाला असला तरी धरण शंभर टक्के भरण्याच्या स्थितीत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धरणाच्या सांडव्यावरून केंव्हाही भिमा नदिपात्रात विसर्ग सुरू होणार असल्याने नदिकाठच्या नागपरिकांना सावधानतेचा ईशारा देण्यात आला असल्याची माहिती धरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT