Online Form Sakal
पुणे

प्रथम वर्ष 'बी. आर्च' अभ्यासक्रमांसाठी १३ नोव्हेंबरपर्यंत करता येणार ऑनलाइन अर्ज

पाच वर्षाच्या पूर्णवेळ आर्किटेक्चर पदवी अभ्यासक्रमाच्या (बी. आर्च) पहिल्या वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना १३ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार.

मीनाक्षी गुरव

पुणे - पाच वर्षाच्या पूर्णवेळ आर्किटेक्चर पदवी अभ्यासक्रमाच्या (बी. आर्च) पहिल्या वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना १३ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. प्रवेश प्रक्रियेतील तात्पुरती गुणवत्ता यादी १७ नोव्हेंबरला, तर अंतिम गुणवत्ता यादी २१ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे.

बॅचरल ऑफ आर्किटेक्चर या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया सध्या सुरू आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) बी.आर्च अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे. यानुसार विद्यार्थ्यांना अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी आणि अर्जनिश्चिती १५ नोव्हेंबरपर्यंत करता येणार असून त्यानंतर अर्ज अंतिम करावे लागणार आहे. प्रवेशाची प्राथमिक तात्पुरती गुणवत्ता यादी १७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. या यादीवर आक्षेप, हरकती नोंदविण्यासाठी १८ आणि १९ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. तर अंतिम गुणवत्ता यादी २१ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यानंतर पहिल्या फेरीतंर्गत विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे पर्याय भरण्यासाठी २२ ते २४ नोव्हेंबर दरम्यानचा कालावधी दिला आहे. या फेरीतील महाविद्यालयांचे तात्पुरते ॲलॉटमेंट २६ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. या फेरीत महाविद्यालये मिळालेल्या विद्यार्थ्यांना २७ ते ३० नोव्हेंबर दरम्यान प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.

या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दोन नियमित प्रवेश फेऱ्या आणि जम्मू-काश्मीर आणि लडाख येथील विद्यार्थ्यांनी समुपदेशन फेरी होणार आहे. ‘बी.आर्च’ची महाविद्यालये एक डिसेंबरपासून सुरू होणार असून ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया १८ डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.

‘बी.आर्च’ अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशाचे वेळापत्रक :

कार्यवाहीचा तपशील : कालावधी

- प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे : १३ नोव्हेंबरपर्यंत

- कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज निश्चिती करणे : १५ नोव्हेंबरपर्यंत

- तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करणे : १७ नोव्हेंबर

- तात्पुरत्या गुणवत्ता यादीवर हरकती, आक्षेप नोंदविणे : १८ ते १९ नोव्हेंबर

- अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करणे : २१ नोव्हेंबर

पहिली प्रवेश फेरी

- पहिल्या फेरीसाठी अर्ज सबमिट करणे आणि महाविद्यालयांचा पर्याय निवडणे : २२ ते २४ नोव्हेंबर

- पहिल्या फेरीतील महाविद्यालयांचे ॲलॉटमेंट जाहीर करणे : २६ नोव्हेंबर

- ॲलॉट झालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेणे, संबंधित महाविद्यालयांनी झालेले प्रवेश निश्चित करणे : २७ ते ३० नोव्हेंबर

दुसरी प्रवेश फेरी :

- दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे : १ डिसेंबर

- दुसऱ्या फेरीसाठी अर्ज सबमिट करणे आणि महाविद्यालयांचा पर्याय निवडणे : २ ते ४ डिसेंबर

- दुसऱ्या फेरीतील महाविद्यालयांचे ॲलॉटमेंट जाहीर करणे : ६ डिसेंबर

- ॲलॉट झालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेणे, संबंधित महाविद्यालयांनी झालेले प्रवेश निश्चित करणे : ७ ते ९ डिसेंबर

- *‘बी.आर्च’ अभ्यासक्रम राबविणारी महाविद्यालये सुरू करणे : १ डिसेंबर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirgudsar Theft : बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि १५ हजार रुपये रोख रक्कम नेली चोरून

TMC rebels join BJP: 'तृणमूल'चे १७ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर? NCPI नेत्याचं धक्कादायक विधान

Marathi News Live Updates : पुण्यात पाच मानाच्या गणपतीसह प्रमुख गणपती मंडळांची प्राणप्रतिष्ठा

रेल्वेत कुटुंबियांसोबत बसण्यासाठी सीट बदलता येते का? जाणून घ्या रेल्वेचा नियम...

LONG LIFE HOROSCOPE: या’ 6 राशींच्या लोकांना मिळतं दीर्घायुष्याचं वरदान? 100 वर्षांनंतरही राहतात निरोगी, ज्योतिषशास्त्रात काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT