fish death in jambhulwadi lake effect health citizen Disposal of Dead Fish in Jambhulwadi Lake sakal
पुणे

Jambhulwadi Lake Fish : जांभूळवाडी तलावातील मृत माशांची विल्हेवाट

जांभूळवाडी तलावात तीन ते चार टन मासे मृत झाल्याची घटना

किशोर गरड

आंबेगाव : नव्याने महापालिकेत सामाविष्ट झालेल्या जांभूळवाडी तलावात तीन ते चार टन मासे मृत झाल्याची घटना नुकतीच घडली होती.त्यानंतर,पाटबंधारे विभागाकडून मृत माशांची विल्हेवाट लावण्यास सुरुवात कालपासून करण्यात आली आहे.परंतु,परिसरातील नागरिक मात्र दुर्गंधीने हैराण झाले आहेत.मृत मासे जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदून पुरण्यात आले.

तलावात वारंवार अशा घटना घडत असल्याने स्थानिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते आहे.त्यावर कायमचा तोडगा काढणे गरजेचे आहे. पाटबंधारे विभाग हा मुख्यत्वे शेती सिंचनासाठी काम करत असल्याने अशा घटना घडल्यानंतर त्यावर विभागाकडून कार्यवाही होण्यास दिरंगाई होते.

शिवाय पाटबंधारे विभागाकडून मनुष्यबळ कमी आणि संबंधित यंत्रणाही नसल्याने कार्यवाहीस दिरंगाई होते आहे. स्थानिकांनी पाटबंधारे विभागाला माहिती कळविल्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने खड्ड्यात पुरण्यास सुरुवात केली. यावेळी ॲक्टिव्ह फाऊंडेशनचे कार्यकर्तेही सहभागी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: शासनाची मोठी कारवाई! ‘लाडक्या बहिणी’ कायमच्या अपात्र; घेतलेले पैसेही परत द्यावे लागणार, पण कुणाला?

Sports: क्रिकेटपटू भाविका अहिरे अंडर १९ महिला संघाच्या कर्णधारपदी; दोंडाईचाचे आजोळ, नाशिकची कन्या

Nanded: कोरोनात आई-वडिलांचे छत्र हरपले; जिद्दीने वैष्णवी बनली डॉक्टर, मेहनतीच्या जोरावर एमबीबीएस केलं पूर्ण

आमची बाळं कुठं आहेत? घरातल्या कुणाशीच चेहरा जुळेना; IVFद्वारे जुळ्या मुलींचा जन्म, DNA रिपोर्ट पाहून दाम्पत्याला धक्का

Latest Live Updates Marathi: चोपड्यात आयसर चालकावर हल्ला; गोवंश वाहतुकीचा आरोप करत गाडीची तोडफोड

SCROLL FOR NEXT