crime esakal
पुणे

Pune Crime : पुणे शहरात बलात्काराच्या पाच घटना आल्या उघडकीस

पुणे शहरात बलात्काराच्या पाच घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत विमानतळ, स्वारगेट, लोणीकंद पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक आणि कोंढवा पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरात बलात्काराच्या पाच घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत विमानतळ, स्वारगेट, लोणीकंद पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक आणि कोंढवा पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत.

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करणाऱ्यावर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमलेश बळिराम मेढे (२४, रा. कलवड, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका २२ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. १८ फेब्रुवारी २०२३ पासून नऱ्हे व खराडीतील लॉजवर हा प्रकार घडला.

कोल्हापूर येथील एका ३४ वर्षीय महिलेला लग्न करण्याचे आमिष दाखवून एकाने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिच्या जवळील सोन्याचे दागिने व ऑनलाइन अडीच लाख रुपये घेऊन फसवणूक केली. हा प्रकार स्वारगेट एसटी स्टँड परिसरात आणि शुक्रवार पेठेतील हॉटेलमध्ये २० फेब्रुवारी ते ८ मेदरम्यान घडला. या प्रकरणी महिलेने मंगळवारी (ता. ११) स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

यावरून विनायक रमेश जाधव याच्यावर बलात्कारासह अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला मूळची कोल्हापूर येथील आहे. आरोपी महिलेच्या ओळखीचा आहे. आरोपी विनायक जाधव याने पीडित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

मोटार घ्यायची असून त्यासाठी पैशांची गरज असल्याचे तिला सांगितले. तसेच गाडी खरेदीसाठी महिलेकडून एक तोळे सोन्याचे दागिने घेतले. त्यानंतर त्याच्या ओळखीच्या लोकांच्या बँक खात्यावर दोन लाख ४७ हजार ५०० रुपये ट्रान्स्फर करून घेतले.

तिसऱ्या घटनेत विवाहित महिलेच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी देऊन एकाने तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार वाघोलीत घडला. या प्रकरणी अजित भीमराम वनवे (रा. कासार शिरसी, बीड) यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ३६ वर्षीय महिलेने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. हा प्रकार २०१९ पासून सुरू होता.

इन्टाग्रामवरून ओळख वाढवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शाहीद सुलताना शेख (१९, रा. मिठानगर) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत एका १५ वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे. आरोपीने तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन हा प्रकार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पाचव्या घटनेत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला गोव्याला व नंतर गुजरात येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी राजू रामनाथ गुप्ता (वय २३, रा. गोरखपूर, उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत अपडेट! केंद्र सरकारने राज्यसभेत दिलं लेखी उत्तर; उद्या सरकारी कर्मचाऱ्यांचा संप

Vande Bharat Cyclothon : वंदे मातरम' कोस्टल सायक्लोथॉन सायकल रॅलीतून सागरी सुरक्षेचा संदेश

T20 World Cup AUS vs IRE : संकटांवर मात करत ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकला; आयर्लंडने स्पर्धेतून जवळपास गाशा गुंडाळला

Latest Marathi News Live Update : पुण्यात तलवारी काढून आणि दगडफेक करत दहशत

Abhishek Sharma : हॉस्पिटलमध्ये भरती झालेल्या अभिषेकबाबत महत्त्वाची अपडेट्स; आजारी पडायला मुंबईत नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT