Girish Mahajan  sakal
पुणे

Ashadhi Wari : तीर्थक्षेत्री सुविधांसाठी पाच कोटी निधी देणार;गिरीश महाजन;निर्मल दिंडीला सुरुवात

राज्यातील सुमारे ४९७ तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भक्तांसाठी आवश्‍यक त्या सर्व सुविधांची उभारणी करण्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविकास खात्याने घेतला आहे. यासाठी या सर्व तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी पाच कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असल्याचे राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील सुमारे ४९७ तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भक्तांसाठी आवश्‍यक त्या सर्व सुविधांची उभारणी करण्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविकास खात्याने घेतला आहे. यासाठी या सर्व तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी पाच कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असल्याचे राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

ग्रामविकास विभागाच्या वतीने संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम महाराज या दोन्ही पालख्यांबरोबर पंढरपूरपर्यंत प्रत्येकी एक स्वच्छता दिंडी पाठविण्यात येणार आहे. या दिंडीला निर्मल वारी असे नाव देण्यात आले आहे. या निर्मल वारीचा प्रारंभ सोमवारी (ता. १) महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, विभागीय उपायुक्त वर्षा लड्डा, विजय मुळीक, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आदी उपस्थित होते.

उज्जैनच्या धर्तीवर राज्यातील पंढरपूर व त्र्यंबकेश्वरसह पाच तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भक्तांसाठी आवश्‍यक त्या सर्व पायाभूत सुविधांची उभारणी केली जाणार आहे. यासाठी प्रारूप आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे महाजन यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्र ही साधुसंतांची भूमी आहे. संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी धार्मिक विचारांबरोबर स्वच्छतेचा आणि सामाजिक संदेशही दिला. निर्मल वारीच्या निमित्ताने हाच संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

आषाढी वारीसाठी राज्यभरातून पालखी सोहळ्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. सरकारने वारकऱ्यांच्या व्यवस्थेसाठी पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. निर्मल वारीसाठी मागील वर्षीपेक्षा अधिक निधी उपलब्ध करून दिला आहे. पालखी मार्गावरील गावांना त्रास होऊ नये, रोगराई पसरू नये यासाठी शासन योग्य ती काळजी घेत असून निर्मल वारीसाठी जिल्ह्यातील स्वयंसेवक, सेवाभावी संस्था, एनसीसी व ‘एनएसएस’च्या विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे’’.

यावेळी विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी निर्मल दिंडीसाठी दिलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले. तसेच प्रातिनिधीक स्वरूपात दोन दिंडी प्रमुखांना औषधोपचार कीटचे वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT