peshwe-park 
पुणे

सारसबाग, पेशवे पार्कचा कायापालट; पाच कोटींची तरतूद 

सकाळवृत्तसेवा

पुणे - शहराच्या मध्यवस्तीत असलेली सारसबाग आणि पेशवे पार्क या उद्यानांचा कायापालट करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पुढील वर्षभरात सारसबाग आणि पेशवे पार्कच्या 32 एकर जागेचा एकात्मिक विकास आराखडा तयार करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे बोटॅनिकल गार्डन "पीपीपी' किंवा "बीओटी' तत्त्वावर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. 

तळ्यातील गणपती म्हणून प्रसिद्ध असलेले पेशवेकालीन गणेश मंदिर व श्री देवदेवेश्‍वर संस्थान मध्यभागी ठेवून  हा विकास आराखडा करण्यात येणार आहे. त्यावेळी तेथील वृक्षांना, जैवविविधेतेला धक्का न लावता बागेच्या परिसराचा पुनर्विकास करण्यात येईल. पुण्यात पहिले जैवविविधता केंद्र, ग्रंथालय, पर्यावरण अध्ययन आणि माहिती केंद्रे, पहिली हेरिटेज पार्क, हंगामी फुलझाडांसाठी कायमस्वरूपी उद्यान उभारण्यात येणार आहे. 
शहरातील दिव्यांगांविषयी जाणीव निर्माण होण्यासाठी सुषमा स्वराज पार्क उभारण्यात येणार आहे. त्यासाठी दीड कोटी रुपयांची तरतूद केली. या पार्कमध्ये 42 प्रकाराची झाडे लावण्यात येणार आहेत. याबाबत ब्रेल लिपीतून माहिती देण्यात येणार आहे. 

पर्यटकांसाठी विविध सुविधा 
सारसबागेची रचना रस्त्यालगत येणार असून, त्यात वाहनतळ, हॉकर्स झोन, फूड प्लाझा अशा सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. देशी-विदेशी पर्यटकांसाठी हा परिसर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल, अशा पद्धतीने ते विकसित करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Edible Oil Import Duty Cut : सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेल होणार स्वस्त; केंद्र सरकारकडून खाद्यतेलाच्या आयात शुल्कात मोठी कपात, सामान्यांना दिलासा

धोनीचा असा जल्लोष परत कधीचं पाहिला नाही! पहिला T20 World Cup जिंकल्यावरच्या सेलिब्रेशनचा Viral Video

अजय देवगणच्या अडचणीत वाढ? मुंबईतील जुहू बंगल्यावर BMC कारवाई, पण नक्की कारण काय?

Congress MLA Resignation : मतदार संघात दुष्काळ जाहीर न केल्याने काँग्रेस आमदार पाटील यांचा राजीनामा

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट; अहेरी दक्षिण भागात मुसळधार पावसाची सुरुवात

SCROLL FOR NEXT