strike 
पुणे

कामगारांचा सुटला संयम आणि पोलिसांची उडाली धावपळ 

नितीन बारवकर

शिरूर (पुणे) : शिरूर तालुक्‍यातील रांजणगाव "एमआयडीसी'तील कारेगाव, ढोक सांगवी, रांजणगाव परिसरातून मध्य प्रदेशात पायी जाण्यासाठी सुमारे पाचशेवर कामगार मध्यरात्री एकत्रितपणे रस्त्यावर उतरले. त्यामुळे आणि ते कोणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने पोलिस व प्रशासनाची काही काळ धावपळ उडाली. दरम्यान, आमदार अशोक पवार यांनी या कामगारांशी संपर्क साधून, "तुम्हाला तुमच्या प्रांतात पोचविण्यासाठी प्रयत्न करू,' असा दिलासा दिल्याने ते शांत झाले. 

लॉकडाउनमुळे गेल्या 25 मार्चपासून कामधंदा नसल्याने व पुढेही लॉकडाउन वाढतच चालल्याने हवालदिल झालेले सुमारे पाचशे ते सहाशे कामगार रविवारी (ता. 3) रात्री उशिरा पायी निघाले होते. मध्यरात्री दीड वाजता सतरा कमानी पुलाजवळ त्यांना पोलिसांनी अडविल्यानंतर ते आक्रमक झाले. त्यामुळे अधिकची पोलिस कुमक बोलवावी लागली.

आमदार पवार, माजी नगरसेवक दादाभाऊ वाखारे यांनी त्यांच्याशी संपर्क साधून शांतता राहण्याचे आवाहन केले. प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसीलदार लैला शेख, पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी कामगारांची भेट घेऊन त्यांची समजूत घातली. दरम्यान, सोमवारी या सर्व कामगारांची शिरूर, तर्डोबाची वाडी व न्हावरे फाटा येथील मंगल कार्यालयात राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली. 

कंपन्या बंद असल्याने हाताला काम नाही, जवळ जे होते ते संपले, आता खायला देखील काही नाही, खोल्यांचे भाडे थकल्याने घरमालक खोल्या खाली करण्यासाठी तगादा लावतात, आम्ही कसेही निभावून नेतो, पण मुलाबाळांचे हाल पाहवत नाहीत. त्यामुळे आता घरी जाण्याशिवाय पर्याय नाही, अशा प्रतिक्रिया या कामगारांनी व्यक्त केल्या. 

रांजणगाव एमआयडीसी परिसरातील कामगारांचा सर्वे केला जात असून, मध्यप्रदेशात जाऊ इच्छिणाऱ्या कामगारांची यादी तयार केली जात आहे. 
- लैला शेख, तहसीलदार, शिरूर 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: तलाठी अन् गट 'क' पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आता थेट पुढच्या वर्षी! जाणून घ्या नवी तारीख

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Gold Rate Today: सणाआधी सोन्याच्या भावात मोठा बदल! खरेदीआधी पाहा तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचा ताजा भाव

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

SCROLL FOR NEXT