Crime sakal
पुणे

Pune Crime : सहकारनगरमधील पाच सराईत गुन्हेगार हद्दपार

सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाच सराईत गुन्हेगारांना पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाच सराईत गुन्हेगारांना पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आल्याची माहिती परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली. सहकारनगरच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी पाच गुन्हेगारांच्या हद्दपारीबाबत प्रस्ताव पाठविला होता.

त्यात सहकारनगर परिसरातील अनिल महादेव चांदणे (वय ४०, रा. तळजाई वसाहत), हर्षद राजेंद्र देशमुख (वय २५, रा.चव्हाणनगर, धनकवडी) आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील किरण परशुराम भंडारे (वय २०), शुभम दीपक ऊर्फ नथ्थु भोरेकर (वय २६, दोघे रा. आंबेगाव बुद्रूक), दत्ता राहुल कदम (वय २२, रा.आंबेगाव खुर्द) यांचा समावेश आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांत परिमंडळ दोनमधील स्वारगेट, भारती विद्यापीठ, सहकारनगर, लष्कर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून ३५ गुन्हेगारांना पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, जबरी चोरी, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, घरफोडी, मालमत्तेचे नुकसान असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीण पाटील यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. सराईत गुन्हेगारांवर यापुढील काळातही प्रतिबंधक कारवाई सुरूच राहील, असे पोलिस उपायुक्त पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT