corona 
पुणे

मुळशी तालुक्यातील या गावांमध्येही आढळले कोरोनाचे रुग्ण 

धोंडिबा कुंभार

पिरंगुट (पुणे) : मुळशी तालुक्यात आज कोरोनाचे आणखी सहा रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबधितांची संख्या आता 70 झाली आहे. त्यापैकी 32 रुग्ण बरे झालेले आहेत. तसेच, अद्याप एकाही कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झालेला नाही, ही दिलासा देणारी बाब आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजित कारंजकर यांनी दिली.   

आज दुपारपर्यंत माले येथे एक हॉटेल व्यावसायिक पुरुषाला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मुठा खोऱ्यातील माळेगाव येथील एक पुरुष व एका महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॅाझिटिव्ह आलेला आहे.  मारूंजी येथील एका महिलेला, तर हिंजवडी येथील 
एका पुरुषास कोरोना झाला आहे. तसेच, पिरंगुट येथील एका 35 वर्षीय कंपनी कामगाराचाही कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता झपाट्याने वाढत चालली असून, नागरिकांनी जास्तीत जास्त काळजी घेणे महत्त्वाचे ठरत आहे.

मुळशी तालुक्यात काल सहाजण  कोरोनाबाधित सापडले होते. काल  लवळे येथे एक, पौडला दोन, माणला एक, जांबे येथे एक, तर 
कासारसाई येथे एकाला कोरोनाची बाधा झाली असल्याने त्यांच्यावर उपचार चालू आहेत. संबंधित रुग्णांच्या राहत्या घराचा परिसर  सील करण्यात आला आहे. अन्य गावांतही कोरोना पॅाझिटिव्ह रुग्णांच्या राहत्या घरांचा परिसर मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून सील करण्यात आलेला आहे.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत पोलिस उपनिरीक्षक अनिल लवटे यांनी सांगितले की, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या  पिरंगुट परिसरातील भाजीविक्रेते , ग्राहक, वाहनचालक व दुकानदारांवर कारवाईची मोहीम रोजच सुरू राहणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT