पुणे

जुन्नरची सुरु होती कोरोनामुक्तीकडे वाटचाल पण...

दत्ता म्हसकर

जुन्नर : जुन्नरची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असताना शुक्रवारी एकाच दिवशी नवीन पाच रुग्णांची भर पडल्याने चिंता वाढली आहे. तीन दिवसानंतर बोरी बुद्रुक येथे एक तर खामुंडी येथे चार नवीन रुग्ण आढळल्याने तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या ३८ वर पोचली आहे. 

जुन्नर, धामणखेल, राजुरी व नवलेवाडी येथील कोरोनाबधितास शुक्रवारी घरी सोडण्यात आले. यामुळे ही गावे कोरोनामुक्त झाली आहेत. जुन्नरला फटाके वाजवत, फुलांची उधळण करत औक्षण करुन कोरोनावर विजय मिळविलेल्या रुग्णाचे स्वागत करण्यात आले.   

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सध्या ओतूर, कुसुर, बोरी व खामुंडी येथील सात जण उपचार घेत असून, ३० जण बरे झाले आहेत तर औरंगपूर येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. बोरी येथील संबंधित रुग्ण मुंबईहून दोन महिन्यांपूर्वी आला होता. त्यास न्यूमोनिया सदृश्य लक्षणे दिसत असल्याने पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्याचे पहिले दोन्ही स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आले होते तर तिसरा निगेटिव्ह आला आहे. खामुंडी येथील चारही जण एकाच कुटूंबातील असून, चारपाच दिवसांपूर्वी मुबईहून आजारी बाबांना घेऊन आले होते. त्यांचे संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

गावनिहाय बरे व मृत्यू झालेले व एक्टिव्ह रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे

 डिंगोरे - १  (बरा), सावरगांव -  ५ (बरे), मांजरवाडी -  २ (बरे),पारुंडे - ३  (बरे), आंबेगव्हाण - २ (बरे),धोलवड - ३ (बरे ), धालेवाडी तर्फे मिन्हेर - १ (बरा), विठ्ठलवाडी -वडज - १ (बरा),शिरोली तर्फे आळे २ (बरे), खिलारवाडी - १(बरा) ,कुरण - १(बरा),
चिंचोली - ३(बरे),ओतुर - १ (बरा) जुन्नर- १(बरा), राजुरी- १(बरा), नवलेवाडी - १(बरा) ,धामणखेल -१(बरा) ,*मृत्यू:- औंरगपूर - १ (मृत्यू), एक्टिव्ह:-
ओतुर -   १,  कुसुर- १,  बोरी- १,खामुंडी-४
एकुण रुग्ण ३८, मृत्यू - १,बरे ३०, ऍक्टिव्ह - ७.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. होम क्वारंटाईन केलेल्यांनी गावात फिरू नये. मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, वारंवार हात साबणाने धुवावेत, सोशल डिस्टन्स पाळावे, कामाशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये, शक्यतो घरातच थांबावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा! विनोद तावडे, वसुंधरा राजे अन् स्मृती इराणी यांच्याकडे मोठी जबाबदारी, वाचा यादी...

IND vs SL 1st Test: गंभीरने त्याला राखून ठेवलं, चेंडू जुना होताच गोलंदाजीला आणलं! १४६ धावांची भागीदारी तोडली; कोण आहे तो?

नागपंचमीच्या मुहूर्तावर सुरू झालं स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली'चं शूटिंग; कोण आहे मुख्य नायिका? कोणती मालिका संपणार?

Income Tax Office Fire: धुराचे लोट अन् कर्मचाऱ्यांची धावपळ, आयकर विभागाच्या कार्यालयाला आग; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनेचा थरार

Marathi News Live Updates : पायाभूत सुविधांच्या अभावामुळे आज आपण इतर राज्यांच्या तुलनेत मागे पडत आहोत - सुळे

SCROLL FOR NEXT