Five prisoners escaped from a temporary jail in Yerwada 
पुणे

येरवड्यातील तात्पुरत्या कारागृहातुन गुरुवारी पहाटे पाच कैदी पळाले

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर (पुणे) : येरवडा येथील तात्पुरत्या कारागृहातुन गुरुवारी (ता. १६) पहाटे गंभीर गुन्ह्यासाठी अटकेत असलेले पाच कुख्यात कैदी पळाले आहेत. पाचपैकी तीन गुन्हेगारांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई सुरु आहे. दरम्यान तीन दिवसांपुर्वी येथुनच पळुन गेलेल्या डिग्रजवाडीच्या कुख्यात कैद्याला परत आणल्याचा आनंद व्यक्त करण्यापुर्वीच पुन्हा एकदा अट्टल पाच कैदी पसार झाल्याने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. पाचपैकी तीन गुन्हेगार दौंड तालुक्यातील तर एकजण लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

देवगण अजिनाथ चव्हाण, गणेश अजिनाथ चव्हाण (रा. दोघेही, बोरावके नगर, दौंड), अक्षय कोंडक्या चव्हाण (रा. लिंगाळी माळवाडी तालुका दौंड), अंजिक्य उत्तम कांबळे, (रा.सहकारनगर, टीळेकरवाडी ता. हवेली) व सनी टायरन पिंटो, (रा. काळेवाडी, वाकड पुणे) ही पळुन गेलेल्या पाच कैद्यांची नावे आहेत. त्यांच्या अटकेसाठी पोलिस पथके रवाना करण्यात आल्याची माहिती येरवडा पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक युनुस शेख या्ंनी दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा येथील तात्पुरत्या कारागृहातुन गुरुवारी पहाटे पाच कैदी पोलिसांची नजर चुकवून पळुन गेले आहेत. पाचपैकी देवगण चव्हाण, गणेश चव्हाण व अक्षय चव्हाण हे तीन गुन्हेगार दौंड तालुक्यातील अट्टल गुन्हेगार असुन, त्यांच्यावर दौंडसह पुणे व नगर जिल्हात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. वरील तीनही जनांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई सुरु आहे. तर अंजिक्य कांबळे हा लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील अट्टल गुन्हेगार असुन, त्याच्यावर खंडणी, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत. तर सनी पिंटो पुणे शहर व पिंपरी-चिंचवड हद्दीतील अट्टल गुन्हेगार आहे. वरील पाचही गुन्हेगार तात्पुरत्या कारागृहातुन पसार झाल्याने, वरील काराग़हाच्या सुरक्षतितेबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान वरील पाचही गुन्हेगारांच्या अटकेसाठी शहर पोलिसांची विशेष पथके रवाना झाली असुन, जिल्हा (ग्रामिन) पोलिसांनाही सतर्क करण्यात आल्याची माहिती येरवडा पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक युनूस शेख  यांनी जाहीर केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breaking News Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्यावर अटक वॉरंट जारी, त्वरीत अटक करण्याचे आदेश

एपस्टिन फाइलमध्ये आहे तरी काय? भारतासह जगभरातील नेते अन् उद्योगपतींनी घेतलाय धसका

Humanity Helps: नाझियाच्या मदतीला धावली माणुसकी! ती सहा महिन्यांपासून देतेय आजाराशी झुंज; उपचारासाठी लाखोंचा खर्च..

Ambajogai Crime : कला केंद्रात कामाचे आमिष दाखवून तरुणीवर सामूहिक अत्याचार; एका महिलेसह चार जणांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : मुंबईतील ईडी कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा

SCROLL FOR NEXT