pune esakal
पुणे

पुण्यात UPSCच्या विद्यार्थ्यांसाठी 'फाईव्ह स्टार' अभ्यास केंद्र

सामाजिक न्याय विभागाकडून आर्थिक तरतुदीचे नियोजन - धनंजय मुंडे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे मार्गदर्शन मिळावे, यासाठी पुण्यात पंचतारांकित अभ्यास केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी जागेच्या उपलब्धतेनुसार आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

सामाजिक न्याय विभाग व संविधान फाऊंडेशनसह अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या उन्नतीसाठी कार्यरत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी मंत्रालयात पार पडली. या वेळी मुंडे म्हणाले, सामाजिक न्याय विभागाला दरवर्षी प्राप्त होणाऱ्या निधीचा वापर नियोजनबद्ध होण्यासाठी प्रत्येक योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी आणि मूल्यमापन करण्यात येणार आहे. त्यासाठी तेलंगणा राज्याच्या धर्तीवर बजेट अंमलबजावणीचा कायदा करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या धर्तीवर अभिमत विद्यापीठांमधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना लाभ देण्याबाबत लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल. कोरोनाच्या कालावधीत राज्य सरकारवर आर्थिक ताण असूनही सामाजिक न्याय विभागाने ९९ टक्के निधी खर्च केला. यावर्षीही अनुसूचित जाती विकास योजनांना ब्रेक लागणार नाही. तसेच, कोणत्याही योजनेचा पैसे इतरत्र वळवला जाणार नाही.

सामाजिक न्याय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार, समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, ‘बार्टी’चे महासंचालक धम्मज्योती गजभिये तसेच संविधान फाउंडेशनचे ई. झेड. खोब्रागडे, डॉ. बबन जोगदंड, अतुल भातकुले, महेंद्र मेश्राम, सिद्धार्थ भरणे, दीपक निरंजन, अतुल खोब्रागडे आदी या बैठकीस उपस्थित होते.

संविधान सभागृहास मंजुरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत समाज मंदिराऐवजी सर्व सुविधायुक्त संविधान सभागृह बांधले जावे, अशी मागणी संविधान फाउंडेशनने यापूर्वी केली होती. त्यावर या योजनेंतर्गत संविधान सभागृह बांधण्यासाठी मंजुरी आणि निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे मुंडे यांनी सांगितले.

पंचतारांकित अभ्यास केंद्र

या अभ्यासकेंद्रात विद्यार्थ्यांना ‘यशदा’च्या धर्तीवर अत्याधुनिक तंत्रज्ञान, ई लायब्ररी, डिजिटल लायब्ररी आणि चांगला कॅम्पस उभारण्यात येईल. अभ्यासास पूरक वातावरण, निवास, भोजन, उत्तम व्यवस्था तसेच नामवंत स्पर्धा परीक्षा कोचिंग क्लासेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. जास्तीत जास्त विद्यार्थी प्रशासकीय सेवेत यावेत यासाठी हा यामागील उद्देश्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT