पुणे

नागठाणे विद्यार्थी जाणार इस्रो सफरीवर

CD

निनामचे विद्यार्थी जाणार इस्रो सफरीवर

पाच जणांची निवड; राज्याबाहेरील सहलीसाठी दोघांची निवड

नागठाणे, ता. २५ : निनाम (ता. सातारा) येथील पाच विद्यार्थ्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथील सहलीसाठी निवड झाली आहे. याच शाळेतील दोन विद्यार्थ्यांची ‘आविष्कार’ अभियानांतर्गत राज्याबाहेरील शैक्षणिक सहलीसाठी निवड झाली आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाविषयी जिज्ञासा, संशोधनाची वृत्ती अन् वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी शासनातर्फे इस्रो सहल आयोजित करण्यात येते. आधुनिक विज्ञान अन् तंत्रज्ञानाच्या युगात अंतराळ संशोधन क्षेत्रातील संधी ग्रामीण विद्यार्थ्यांना प्राप्त होण्यासाठीही हा उपक्रम प्रेरक मानला जातो. त्यात विनीत जाधव, अंतरा जाधव, दर्श शिंदे, शुभ्रा महाडिक, निरंजना वाटांबळे हे विद्यार्थी इस्रो सफरीचे मानकरी ठरले आहेत. शंभूराज चव्हाण, स्वरा जाधव या दोघांची राज्याबाहेरील विशेष शैक्षणिक सहलीसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना उपक्रमशील शिक्षक नंदकुमार कदम, मुख्याध्यापिका संगीता घोरपडे तसेच सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे. गटशिक्षणाधिकारी जयश्री शिंगाडे, विस्तार अधिकारी शशिकला जगताप, केंद्रप्रमुख सुनीता शेडगे तसेच ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे, शाळेचे कौतुक केले आहे.

चौकट
प्रत्यक्ष अनुभूतीची संधी
सहभागी विद्यार्थ्यांना इस्रो येथे भेट देऊन उपग्रह निर्मिती, प्रक्षेपण तंत्रज्ञान, प्रत्यक्ष रॅाकेटचे प्रक्षेपण पाहणे अन् अंतराळ संशोधन प्रकल्पांविषयी प्रत्यक्ष माहिती घेण्याची संधी लाभणार आहे. विज्ञानविषयक कार्यशाळा, शास्त्रज्ञांशी, तज्ज्ञांशी संवादाच्या माध्यमातून त्यांना अनुभवाधिष्ठित शिक्षणाचाही लाभ होणार आहे.

छायाचित्र ओळी
08206
निनाम : यशस्वी विद्यार्थ्यांसोबत शाळेचा शिक्षकवृंद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: भाडेकरूंना मोठा दिलासा! मालमत्तेचा हिस्सा घेतल्यास घरातून बेदखल करता येणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबईच्या खेळाडूंना मिळणार वार्षिक करार! पण रोहित शर्मा, शिवम दुबे, सर्फराज खान अपात्र; MCA कडून वर्षाला किती लाख होते मिळणार?

Jalgaon Heatwave : जळगाव जिल्‍ह्यात उष्णतेची लाट कायम! उन्‍हाच्‍या तीव्र झळा; जिल्‍ह्यातील सर्वच शहरांतील तापमान ४२ अंशांवर

Delhi Airport: दिल्ली विमानतळावर थरारक क्षण! दोन विमानांच्या पंख्याची धडक, काही सेकंदांत वाचले शेकडो जीव

भारतातील नवीन ग्रॅज्युएट्ससाठी AI स्पेशलिस्ट' अन् 'कंटेंट क्रिएटर' ठरतायेत टॉप करिअर ट्रेंड्स! LinkedIn ‘Grads Guide 2026’ अहवाल

SCROLL FOR NEXT