Bhima Koregaon Visitors Positive e sakal
पुणे

कोरेगाव-भीमा : चार लाख अनुयायांची उपस्थिती, ५ जण कोरोना पॉझिटिव्ह

सकाळ डिजिटल टीम

पुणे : देशभरातील चार लाख अनुयायी कोरेगाव-भीमा (Koregaon Bhima) येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आले होते. त्यापैकी पाच जणांची कोरोना चाचणी (Corona) पॉझिटिव्ह आली आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी माहिती दिली. महाराष्ट्रात ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येत (Maharashtra Omicron Cases) वाढ होत असताना चार लाख लोकांच्या गर्दीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

विजयस्तंभाला भेट देणाऱ्या लोकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५,७६५ लोकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यापैकी दोन जण नाशिक, तीन जण पुणे जिल्ह्यातील आहेत. पाचही जणांना कुठलेही लक्षणं नसून त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असं आयुष प्रसाद यांनी सांगितलं.

चार लाख अनुयायांची उपस्थिती असताना देखील सर्व काही शांततेत पार पडले, असं जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी टाइम्स ऑफ इंडियासोबत बोलताना सांगितले. आम्ही सुरक्षेच्या दृष्टीनं सर्व काळजी घेतली होती. तसेच परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावले होते. विजयस्तंभाजवळ गर्दी होऊ नये यासाठी आमचे काही कर्मचारी तैनात केले होते, असंही देशमुख यांनी सांगितलं.

चिंता वाढली! -

देशात ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे. भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे. गेल्या २४ तासात देशात तब्बल २७ हजार ५५३ नवे रुग्ण सापडले आहेत. तर दिवसभरात २८४ जणांचा मृत्यू झाला आहे. वेगाने पसरणाऱ्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या १५२५ इतकी झाली आहे. यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. त्यामुळे सरकारने अनेक निर्बंध देखील लावले आहेत. पण, आता चार लाख लोकांच्या गर्दीमध्ये पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महात्मा गांधींच्या पुतळ्याला भाजपची टोपी, हातात पक्षाचा झेंडा; NDAच्या शिबिरात नेत्यांचा प्रताप, काँग्रेसचा हल्लाबोल

Maharashtra Politics : ३२ टक्के राजकारणी घराणेशाहीचे प्रतिक; ‘एडीआर’च्या अहवालातील महाराष्ट्राची स्थिती

Junnar News: 'ड्रंक अँड ड्राईव्ह आरोपींना आर्थिक दंडाबरोबर दोन वृक्ष लावण्याचा आदेश'; लोकन्यायालयातील पर्यावरणपूरक निर्णयाचे होतेय कौतुक

Pune News : पुण्यातील शेतकऱ्याच्या अनोख्या आंदोलनाची चर्चा; तीन वेळा आमरण उपोषण करूनही दखल नाही, आता थेट कारवरच...

IND vs PAK Asia Cup 2025: पहलगाम हल्ल्यानंतर युद्ध केलंत, तेही नीट केले नाही, मागे हटायला...; पाकिस्तानी खेळाडूचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT