DICCI
DICCI Sakal
पुणे

देशभरात पाच हजार दलित महिला उद्योजक निर्माण करणार - मिलिंद कांबळे

सकाळ वृत्तसेवा

‘डिक्की’च्या वतीने हॉटेल लेमन ट्री येथील सभागृहात महिला दिनानिमित्त उत्कृष्ट महिला उद्योजक पुरस्कार आणि महिलांसाठी उद्योग व्यवसाय मार्गदर्शन परिषदेत ते बोलत होते.

पुणे - देशभरात दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) (Dicci) आणि केंद्र सरकारच्या (Central Government) विविध योजनांच्या माध्यमातून देशभरात येत्या पाच वर्षांत पाच हजार दलित महिला (Dalit Women) उद्योजक (Entrepreneurs) निर्माण करणार असल्याचा संकल्प आयआयएम जम्मूचे चेअरमन आणि ‘डिक्की’चे संस्थापक मिलिंद कांबळे (Milind Kamble) यांनी व्यक्त केला.

‘डिक्की’च्या वतीने हॉटेल लेमन ट्री येथील सभागृहात महिला दिनानिमित्त उत्कृष्ट महिला उद्योजक पुरस्कार आणि महिलांसाठी उद्योग व्यवसाय मार्गदर्शन परिषदेत ते बोलत होते.

कांबळे म्हणाले, देशभरात आम्ही संस्थेच्या वतीने विविध योजना राबवीत आहोत. सध्या केंद्र सरकार मुद्रा योजना, स्टँड अप योजना यासारख्या योजना नवीन उद्योजक तयार होण्यासाठी राबवीत आहे. आमच्या संस्थेच्या माध्यमातून दलित, उपेक्षित समाजातील महिलांना आर्थिकदृष्टया सक्षम बनविण्यासाठी देशभर नवीन महिला उद्योजकांना मदत आणि उभारणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

एमएसएमइ विभागाच्या मुख्य संयुक्त सचिव अलका अरोरा म्हणाल्या, महिलांनी उद्योग व्यवसायात प्रामुख्याने आले पाहिजे. त्यामुळे भारत देशाची एक नवी ओळख निर्माण होईल आणि देश प्रगतीच्या शिखरावर जाईल. त्यांनी केंद्र सरकारच्या योजनांची माहिती दिली. या वेळी अरोरा यांच्या हस्ते यशस्वी महिला उद्योजकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. ‘डिक्की’चे राष्ट्रीय अध्यक्ष रविकुमार नररा, शहराध्यक्ष अनिल होवाळे, सीमा कांबळे, अविनाश जगताप, संजीव डांगी, प्राजक्ता गायकवाड, निवेदिता कांबळे, संतोष कांबळे यांच्यासह ‘डिक्की’च्या महिला विभागाच्या पदाधिकारी आणि उद्योजिका उपस्थित होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: मोदीजी हिंमत असेल तर संपवण्याचा प्रयत्न करुन बघा...; उद्धव ठाकरेंचं थेट आव्हान

PM Modi In Mumbai: राहुल गांधींना फक्त एक गोष्ट करायला सांगा; पंतप्रधान मोदींचे शरद पवारांना आव्हान

Raj Thackeray: मराठीला अभिजात दर्जा, मराठ्यांचा इतिहास अन् मुंबई-गोवा महामार्ग...; राज ठाकरेंनी मोदींकडं व्यक्त केल्या ७ अपेक्षा

RCB vs CSK : खेळ आरसीबी, सीएसके अन् पावसाचा; प्ले ऑफचा चौथा संघ ठरवणारा सामना

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर

SCROLL FOR NEXT