walse patil sakal media
पुणे

दोन एकर जागेवर होणाऱ्या सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी प्रशासनाकडून सहकार्य : गृहमंत्री

डी. के. वळसे पाटील, मंचर

मंचर : जुन्नर तालुक्यातील शिरोली कोविड उपचार केंद्रासाठी 5 व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले जातील. नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन कामकाज सुरु होण्यासाठी व नारायणगाव येथे डॉ. संदीप डोळे यांच्या दोन एकर जमिनीत सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीसाठी प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल. असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

अवसरी फाटा (ता. आंबेगाव) येथे जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके व पुणे जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांनी वळसे पाटील यांची भेट घेऊन जुन्नर तालुक्यात कोरोनाबाधित तसेच अन्य रुग्णांवरही उपचार करण्यासाठी कायमस्वरूपी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, अशी मागणी केली. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, देवेंद्र शहा, संतोष नाना खैरे उपस्थित होते.

बेनके म्हणाले, ''जुन्नर तालुक्यात कोविड उपचार केंद्रामध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 142 ग्रामपंचायतींनी 15 व्या वित्त आयोगातून आरोग्यासाठी निधी देण्याची तयारी दर्शविली आहे. याबाबत आशा बुचके यांनी पुढाकार घेऊन अनेक सरपंच यांचे बरोबर सकारत्मक चर्चा केली आहे. या कामी आयुष प्रसाद यांनी सहकार्य करावे”. यापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट आशा बुचके यांनी घेतली होती. याबाबतची चर्चा सुरू असतानाच त्यांनी दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतली. त्या म्हणाल्या, तुमच्या नेतृत्वाखाली बेनके यांच्याबरोबर मी यापुढेही राजकारणाविरहीत काम करत राहील. पण जुन्नर तालुक्यातील आरोग्य सुविधाकडे तुम्ही अधिक लक्ष द्या”. बुचके यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT