पुणे

सोलापूर- उजनी जलाशयावर केवळ नऊ टक्के क्षेत्रावरच ‘फ्लोटिंग सोलार’ प्रकल्प

CD

उजनी जलाशयावर केवळ नऊ टक्के
क्षेत्रावरच ‘फ्लोटिंग सोलार’ प्रकल्प

- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे स्पष्टीकरण

ॲग्रोवन वृत्तसेवा
सोलापूर : उजनी जलाशयावर प्रस्तावित असलेल्या फ्लोटिंग सोलार प्रकल्पाबाबत जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. उजनीच्या ३३ हजार ६३० हेक्टरच्या एकूण संचय पातळीपैकी केवळ ९ टक्के म्हणजेच तीन हजार हेक्टर क्षेत्रावरच हा प्रकल्प उभारला जाणार असून, उर्वरित ९१ टक्के जलक्षेत्र पूर्णपणे खुले राहणार स्पष्ट करण्यात आले आहे.

उजनी धरणावरील प्रकल्पाला होणाऱ्या वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. उजनी धरण परिसरात तरंगता सौरऊर्जा प्रकल्प, बॅटरी स्टोअरेज आणि अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित डेटा सेंटर उभारण्यासाठी शासनाने १६ एप्रिल २०२६ रोजी सामंजस्य करार केला आहे. या प्रकल्पांतर्गत प्रकल्पात तरंगती सौरऊर्जा निर्मिती-२,००० मेगावॉट क्षमता, बॅटरी साठवणूक व्यवस्था- १,८०० मेगावॉट क्षमता, एआय डेटा सेंटर- १.४ गिगावॉट क्षमता असणार आहे. या प्रकल्पामुळे सुमारे २,८०० कायमस्वरूपी आणि ४०,००० प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याचा अंदाज आहे. सोलापूर व पुणे जिल्ह्यांतील अभियांत्रिकी व उच्च तंत्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर रोजगारासह उच्च तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पांमध्ये इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध होतील. जलसंपदा विभागाच्या जागेत गेल्या ४० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भीमानगरमधील ३११ कुटुंबांना ५१.१८ एकर क्षेत्र विनामोबदला उपलब्ध करून देण्यात आले आहे. या क्षेत्राबाहेर कोणतेही खासगी घर नसल्याने प्रकल्पासाठी कोणत्याही खासगी घरांचे विस्थापन होणार नाही.

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी भीमानगर-रांझणी (११०.२८ एकर), तरटगाव (९०.३९ एकर) आणि हिंगणगाव (२१५.०८ एकर) असे एकूण ४१५.७५ एकर शासकीय क्षेत्र वापरले जाणार असून, दुसऱ्या टप्प्यासाठी वनविभागाच्या मान्यतेनंतर १७४ एकर क्षेत्राचा विचार केला जाईल.
--------------
चौकट-१
पाण्याचा वापर नियंत्रित
डेटा सेंटरसाठी पारंपरिक पद्धतीऐवजी ''क्लोज्ड लूप डायरेक्ट टू चिप'' या अत्याधुनिक शीतकरण तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यात शीतक द्रव बंद पाइपमध्येच फिरत राहत असल्याने पाण्याचा अपव्यय टळेल. या प्रकल्पासाठी वर्षाला केवळ ०.४२ टीएमसी आणि कमाल ०.५ (अर्धा) टीएमसी पाण्याचीच गरज भासणार असून इतर कोणत्याही प्रकल्पासाठी अतिरिक्त पाणी वापरले जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus: दिवाळीत गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! लालपरीच्या जादा फेऱ्या, मुंबई विभागाचा मोठा निर्णय

Mumbai News: समुद्रात उभे राहणार नौकांचे शहर! मुंबईच्या पर्यटनाला नवी ओळख मिळणार; कसा असेल ९२२ कोटींचा प्रकल्प?

Marathi News Live Updates : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात विधिवत पूजा; राज्यपाल व मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांची उपस्थिती

Beed Crime : घरफोडी, चोऱ्या करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा बीड एलसीबीने केला पर्दाफाश; ​४ गुन्हे उघडकीस; ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

दिल्लीत इंडिया आघाडीची 'मॉक संसद'! मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात प्रतिकात्मक महाभियोग; ज्ञानेश कुमारांची खुर्ची धोक्यात?

SCROLL FOR NEXT