Bakri-Eid 
पुणे

मदत पाठवून बकरी ईद साजरी

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महापुरामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये लाखो नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यांच्या दुःखावर मदतीची फुंकर मारत मुस्लिम बांधवांनी बकरी ईद साजरी केली. यानिमित्त जीवनावश्‍यक वस्तू, कपडे या माध्यमांतून पूरग्रस्तांना मदत पाठविण्यात आली.  

‘ईद -उल अजहा’ म्हणजेच ‘बकरी ईद’निमित्त सकाळी सव्वानऊ वाजता गोळीबार मैदान येथील ईदगाहवर मुस्लिम बांधवांनी नमाजपठण केले. लहान मुलांसह हजारो मुस्लिम बांधवांनी नमाजपठण करत ‘अल्लाह’कडे आशीर्वाद मागितला. नैसर्गिक संकटात सापडलेल्या मानव जातीचे रक्षण कर, आम्हाला मदत कर, आमच्यावरील संकट टळू दे, असे साकडे या वेळी घालण्यात आले. नमाज पठणानंतर एकमेकांच्या गळ्यात पडून ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. 

शहरातील २५० मशिदींमध्ये सकाळी साडेसहा ते साडेदहा या वेळेत नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर मुस्लिम बांधवांनी बकऱ्यांची कुर्बानी दिली. नातेवाईक, गोरगरिबांना त्याचे वाटप करण्यात आले.

गोळीबार मैदानासह शहरातील विविध मशिदींमध्ये नमाज अदा करण्यात आली. या वेळी पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार शहरातून कोल्हापूर, सांगली भागांतील पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणात मदत पाठविण्यात आली. 
- रफिउद्दीन शेख, सरचिटणीस, हिलाल कमिटी (चाँद कमिटी)  

‘बकरी ईद’ला आम्ही कुर्बानीसाठी जो बकरा घेतो त्यामध्ये बचत केली. त्यातून जमा झालेली सुमारे दीड लाख रुपयांची मदत कोल्हापूर, सांगली येथे पाठविण्यात आली आहे.  
- यासीन शेख, सचिव, बंधुभाव भाईचारा फाउंडेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजय सत्तेपासून दूर राहिला तर कोण मारणार बाजी? स्टालिन फिरवू शकतात गेम, तर राज्यपालांकडे शेवटचा पर्याय

llegal Mining Crackdown: धावत्या जेसीबीला लटकून ३ किमी पाठलाग; नायब तहसीलदारांची धाडसी कारवाई

विराटचा एकेकाळचा टीममेट, पंजाब किंग्जच्या माजी क्रिकेटरचं वयाच्या ३६व्या वर्षी निधन; युवराज म्हणाला, त्याच्यासोबत ड्रेसिंग रूम...

Crime: धक्कादायक! क्षुल्लक कारणावरून पत्नीसोबत वाजलं; रागाच्या भरात पतीनं स्वत:चं गुप्तांग कापलं, नेमकं प्रकरण काय?

Nanded Accident : रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक; सेवानिवृत्त सहकार अधिकारी राजेश उल्लेवार यांचे निधन

SCROLL FOR NEXT