पुणे

ओगलेवाडी ः पावसाच्या अनियमितपणाने फुलांच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने शेतकऱ्यांस आर्थिक फटका व निराशा होण्याची वेळ

CD

पावसाच्या अनियमिततेचा फूल उत्पादकांना फटका

ऐन सण-उत्सवात उत्पादनावर परिणाम; आर्थिक फटका बसल्याने शेतकरी निराश


मुकुंद भट ः सकाळ वृत्तसेवा
ओगलेवाडी, ता. ७ ः पावसाच्या अनियमिततेचा फूल उत्पादक शेतकऱ्यांना फटका सोसावा लागत आहे. हजारमाची (ता. कऱ्हाड) येथील शेतकरी बाळकृष्ण चंद्रू पाटील यांनी दहा गुंठ्यात केलेल्या समृद्धी शेवंतीच्या फुलांची आंतरपिकात दोन हजार रोपांची मेहनतीने केलेली लागण त्यावेळच्या पावसाने पाण्यात गेली. सध्या त्याचा फुलांच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने त्यांना आर्थिक नुकसानीचा फटका सहन करावा लागत आहे. श्रावण महिना सुरू असल्याने तसेच गणेशोत्सव जवळ आल्याने फुलांना मागणी व दर वाढत असताना केवळ उत्पादनाअभावी शेतकऱ्यावर निराश होण्याची वेळ आली आहे.

यंदा निसर्गाचे चक्र बदलल्याने कधी जादा, तर कधी कमी पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीचे उत्पादनाचे आर्थिक गणित बिघडले. पावसाच्या अडचणीमुळे शेतकरी बाळकृष्ण पाटील यांनी शासन दरबारी अर्ज व हेलपाटे घालून मुख्यमंत्री निधीतून दहा टक्के रक्कम भरून सौरऊर्जा, पाणी पंप यंत्रणा शेतात कार्यान्वित केली. त्यावर त्यांनी शेतात भुईमूग, शेवगा, घेवडा, मेथी, कोथिंबीरचे उत्पादन घेतले. आधुनिक प्रयोगशील शेती केली.
दरम्यान, ‘सकाळ’च्या ‘ॲग्रोवन’मधील माहितीमुळे मार्गदर्शन व मदत मिळत असून, हे दैनिक शेतकऱ्यांना आधार देणारे असल्याचे बाळकृष्ण पाटील व त्यांच्या पत्नी सीमा पाटील यांनी यावेळी नमूद केले.

.............
चौकट
................
फुलांचे ४५ प्रकार

फुलांची राणी समृद्धी शेवंती लोकप्रिय असलेले सुगंधी व आकर्षक फूल आहे. त्याचे सौंदर्य व विविध रंगांमुळे त्यास ‘फुलांची राणी’ म्हणून ओळख आहे. सजावट व धार्मिक कार्यास त्याचा उपयोग होतो. या फुलांचे महाराष्ट्रात ४५ प्रकार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.


W46566
हजारमाची ः बाळकृष्ण पाटील यांनी दहा गुंठ्यात आंतरपिकात केलेली शेवंती फुलाची लागण पावसाच्या अनियमितपणामुळे जगवण्याची धडपड करावी लागत आहे.
--------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद होणार, गणेशोत्सवासाठी प्रशासनाची खबरदारी

निवेदिता सराफ करतात ते इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय? किती ते किती वाजेपर्यंत करतात? म्हणाल्या, 'मी कायम...'

Women’s Asia Cup 2026: टीम इंडिया जिंकली तर पुन्हा होणार ‘ट्रॉफी ड्रामा’? मोहसिन नकवी फायनलमध्ये येणार, गेल्या वर्षाची आठवण ताजी

Marathi News Live Updates : शेतकऱ्यांचं झाडावर चढून आंदोलन

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर उपायासाठी हालचालींना वेग; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडच्या भूसंपादनाला गती

SCROLL FOR NEXT