Pune News sakal
पुणे

Pune News : प्रवासी महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘जागा दाखवा’ प्रबोधनात्मक व्हिडीओ दाखविण्याच्या उपक्रमास ३०० एसटी स्थानकांवर प्रारंभ..

Pune News : एसटी महामंडळाच्या बसमध्ये प्रवासी महिलांची संख्या वाढती असल्याने त्यांच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अक्षरा सेंटर या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे: एसटी महामंडळाच्या बसमध्ये प्रवासी महिलांची संख्या वाढती असल्याने त्यांच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अक्षरा सेंटर या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला आहे.

त्यांनी ‘जागा दाखवा’ या संकल्पनेवर आधारित प्रबोधनात्मक तीन व्हिडीओ तयार केले असून एसटी महामंडळाने राज्यातील सर्व स्थानकांवरील डिजीटल स्क्रिनवर ते प्रसारित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हे व्हिडीओ तब्बल ९० लाखांहून नागरिकांनी बघितले असून ८६ हजारपेक्षा जास्त प्रतिक्रिया आल्या आहेत.

राज्य सरकारने महिलांना तिकिटाच्या अर्ध्या दरात प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे एसटी बसमध्ये प्रवासी महिलांची संख्या वाढत आहे. त्यामुळे बसमध्ये महिलांची छेड काढणे, त्यांना त्रास देणे आदी प्रकार सुरू झाले आहेत.

त्याला अटकाव करण्यासाठी अक्षरा सेंटरच्या सहसंस्थापक डॉ. नंदीता शहा यांनी पुढाकार घेतला. प्रत्येकी ३० सेकंदांचे प्रबोधनात्मक तीन व्हिडीओ त्यांनी एसटी महामंडळाला तयार करून दिले. त्यात बसमध्ये महिलांबरोबर आगळीक होत असेल तर, संबंधितांना त्यांची ‘जागा दाखवा’ असा संदेश त्यात देण्यात आला आहे.

प्रवासी महिलांच्या सुरक्षिततेसाठी अक्षरा सेंटर गेली दहा वर्षे मुंबईत ‘बेस्ट’बरोबर कार्यरत आहे. त्यासाठी त्यांनी आचारसंहिता तयार केली असून बेस्टच्या २६ डेपोतील १३ हजार ५०० चालक- वाहकांना त्याबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे.

डॉ. नंदीता शहा ः एसटी बसमध्ये प्रवासी महिलांची संख्या वाढती आहे. अनेकदा त्यांना पुरुष प्रवाशांकडून होणाऱ्या गैरप्रकारांना सामोरे जावे लागते. भीतीमुळे त्या बोलत नाहीत. परंतु, त्यांच्यात जागरूकता निर्माण करून बस प्रवासात सुरक्षितता निर्माण करण्याचा उद्देशाने हे व्हिडीओ तयार केले आहेत. त्यामाध्यमातून जागरूकता होत असून काही प्रमाणात बदलासही प्रारंभ झाला आहे.

अभिजीत भोसले (जनसंपर्क अधिकारी, एसटी महामंडळ) ः प्रवासी महिलांच्या सुरक्षितेतासाठी जागरूकता निर्माण करणारे व्हिडीओ एसटीच्या ५६० पैकी ३०० स्थानकांतील डिजीटल स्क्रिनवर दाखविले जात आहेत. उर्वरित स्थानकांवरही ते अल्पावधीत दाखविले जातील. तसेच या बाबत वाहक-चालकांनाही प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे.

  • - एसटी महामंडळाची सरासरी प्रवासी संख्या - ५५ लाख, महिलांची संख्या २२ लाख

  • - एसटीतील वाहक - ३८ हजार, चालक ३४ हजार

  • - बसमार्ग - १ लाख

  • - एसटीच्या बस १४ हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Jafari Iran strategy: अली जाफरी कोण आहेत? इराणची कडवी झुंज! अमेरिका-इस्रायलसारख्या महाशक्तींचा विजय का अशक्य ठरतोय?

Supreme Court on Menstrual Leave : ...तर महिलांच्या करिअरवर परिणाम; मासिक पाळीच्या रजेबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

'मला इच्छा आहे परंतु मी प्रेग्नेट नाही' नीना गुप्ता यांचा खुलासा, म्हणाल्या...'गोड बातमी असावी असं वाटतं पण...'

IPL 2026 Marathi News: कदाचित महेंद्रसिंग धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा, तो पिवळ्या जर्सीत पुन्हा दिसणार नाही !

Student Emotional Story : 'आई-वडील या जगात नाहीत..', चिमुरड्याचे 'ते' शब्द ऐकून डोळ्यात येईल पाणी; शिक्षकानं त्याच्यासोबत जे केलं, ते पाहून तुम्हीही कराल सलाम!

SCROLL FOR NEXT