Chavani123 
पुणे

पशुपालकांना गुड न्यूज, छावण्यांना मुदतवाढ

राजकुमार थोरात

वालचंदनगर ः राज्यातील चारा छावण्यांना 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात आदेश 30 जुलै रोजी काढण्यात आला आहे.

राज्यामध्ये मॉन्सूनचे उशिरा आगमन झाल्यामुळे इंदापूर तालुक्‍यासह पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यामध्ये जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर आहे. राज्य सरकारने 31 जुलैपर्यंत चारा छावण्या सुरू ठेवण्याचा यापूर्वी निर्णय घेतला होता. मात्र, चारा पिकांची पेरणी केल्यानंतर किमान दोन ते तीन महिने चारापिके येण्यास वेळ लागणार असल्यामुळे चारा छावण्यांना मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. ही मागणी मान्य करून 31 ऑगस्टपर्यंत चारा छावण्या सुरू ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

इंदापूर तालुक्‍यामध्ये सोनाई कृषी प्रक्रिया कारखाना, नीरा भीमा सहकारी साखर कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती, श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, कर्मयोगी सहकारी साखर कारखाना व जय भवानीगड प्रतिष्ठानच्या वतीने 11 छावण्या सुरू आहेत. छावणीमध्ये 14 हजारपेक्षा जास्त जनावरे आहेत. या जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. छावणीतील मोठ्या जनावरांना दररोज 18 किलो व लहान जनावरांना 9 किलो चारा व पशुखाद्य मिळत आहे.

इंदापूर तालुक्‍यामध्ये चालू वर्षीही पावसाने पाठ फिरवली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर आहे. छावणीला मुदतवाढ मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा चाऱ्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे, असे जिल्हा परिषदेतील बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs RR: हार्दिक पांड्याने टॉस जिंकला, पण जसप्रीत बुमराहला Playing XI मधून बाहेर केलं; कारण काय सांगितलं?

Vidarbha Birds News : करणवाडी तलावात दुर्मिळ ‘लाँग-टोएड स्टिंट’चा शोध; पांढरकवडा वनक्षेत्रातील पाणथळ अधिवासांचे वैज्ञानिक दस्तऐवजीकरण तातडीचे

Mumbai Goa National Highway : मुंबई-गोवा महामार्गात पुलांच्या कामात अडथळे, पावसाळ्यात वाहतूक कोंडीची मोठी समस्या; प्राधिकरणाचा दावा ठरणार फोल

Latest Marathi News Live Update : अधिक महिन्यानिमित्त माहूरच्या श्री रेणुका देवी गडावर भाविकांची प्रचंड गर्दी

Leopard Death on Highway: पाटसजवळ पुणे–सोलापूर महामार्गावर आढळला बिबट्याचा मृतदेह

SCROLL FOR NEXT