पुणे

सेलू तालुक्यात चारा सखी करणार चारा संवर्धनावर जागृती

CD

सेलू तालुक्यात चारा सखी
करणार चारा संवर्धनावर जागृती

ॲग्रोवन वृत्तसेवा
परभणी ः दुष्काळजन्य परिस्थितीत पशुधनासाठी चारा उत्पादन, चारा संवर्धन, चारा साक्षरता या बाबत शेतकरी पशुपालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सेलू तालुक्यातील कृषी सखी, पशू सखी यांना पशुसंवर्धन विभागातर्फे प्रशिक्षण देण्यात आले. सर्व चारा सखी आता गावागावांत जाऊन चारा साक्षरता चारा संवर्धन व जास्तीत जास्त चारा उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीषा माथूर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मनोज घाटे यांच्या मार्गदर्शानात गटविकास अधिकारी उदय जाधव, पशुधन विकास अधिकारी डॉ. दीपक धर्माधिकारी, उमेदच्या तालुका प्रमुख शीतल बावणे यांच्या कल्पनेतून पशुसंवर्धन विभाग सेलु व उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा संकल्प अभियानअंतर्गत तालुक्यातील चाऱ्याचे क्षेत्र वाढविण्यासाठी तालुक्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी पशुधनाचा विमा काढण्यासाठी तालुक्यामध्ये जास्तीत जास्त पशुपालकांकडे मुरघास निर्मिती अजोला लागवड हायड्रोपोनिक निर्मिती व निकृष्ट चारा सकस करण्याकरिता या सर्व चारा सखी तालुक्यातील सर्व गावांमध्ये त्या त्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने चारा साक्षरतेचे धडे पशुपालक शेतकर्‍यांना देणार आहेत. त्यादृष्टीने आयोजित प्रशिक्षणात डॉ. प्रदीप साळवे, डॉ. अश्विन भरड, डॉ. दीपक धर्माधिकारी यांनी शेतीपूरक शेळीपालन, कुक्कुटपालन, चारा पिकांची लागवड, सकस चारा उत्पादन, लसीकरण आदी विषयावर मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत जागतिक दर्जाचे मरीना उभारणार, ९२३ कोटींचा प्रकल्पाची घोषणा; सुरक्षिततेला प्राधान्य

Beed Crime : चमत्काराचा बहाणा करून वृद्धाला लुबाडणारा सराईत जेरबंद; परळी बसस्थानकातील अंगठी लांबवणाऱ्या नाशिकच्या ठगास एलसीबीच्या बेड्या

Maharashtra Live News: छत्रपती कारखान्याचे १५ दिवसात १ लाख ७३५३ टन उसाचे गाळप

E-Bus Fire : पुण्यात चालत्या ई-बसला आग; १७ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला!

दिल्लीतील धुक्याचा भारत श्रीलंका वनडे सामन्याला फटका बसणार? रोहित विराटच्या चाहत्यांची धाकधूक वाढली, सामना दुसरीकडे हलवण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT