ग्राफिक
------------
राज्यात ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’
संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाची पूर्वतयारी
ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : राज्यातील काही भागांमध्ये पर्जन्यमानातील तूट व खरीप पिकांच्या उत्पादनावर झालेला परिणाम विचारात घेता, आगामी काळात पशुधनासाठी हिरवा व वाळलेला चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, संभाव्य टंचाई निर्माण होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक आणि पूर्वतयारीच्या उपाययोजना म्हणून पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यभरात ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ व्यापक स्वरूपात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट
‘चारा टंचाई येण्यापूर्वी उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर’
- चारा संवर्धन
- चारा उत्पादन
- उपलब्ध चाऱ्याची सुरक्षित साठवणूक
- पीक अवशेषांचा उपयोग
- चाऱ्यावर प्रक्रिया
- पशुपालकांना प्रशिक्षण
- प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन
- स्थानिक पातळीवर चारा व्यवस्थापन
पीक अवशेषांचा उपयोग
काढणीनंतर उपलब्ध होणारे : कडबा, भुसा, पेंढा, धाटे
काय करायचे?
संकलन → सुरक्षित साठवणूक → प्रक्रिया → पोषणमूल्यवर्धन → सकस चारा
महत्त्वाचे :
पीक अवशेष जाळणे व नासाडी पूर्णपणे टाळणे.
अभियानांतर्गत अनिवार्य १३ प्रमुख बाबी
१. गावनिहाय पीक अवशेषांची माहिती घेऊन पावसापासून संरक्षण, योग्य आर्द्रता, बुरशी प्रतिबंध व कोरड्या जागेवरील साठवणुकीबाबत प्रात्यक्षिके.
२. निकृष्ट व वाळलेल्या चाऱ्याची उपयोगिता वाढवण्यासाठी शिफारस केलेल्या प्रक्रिया पद्धतींची प्रात्यक्षिके.
३. कडबा व पेंढ्यावर गावस्तरावर युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व शास्त्रोक्त प्रशिक्षण.
४. चाऱ्याची नासाडी रोखण्यासाठी कडबाकुट्टी यंत्राचा वापर वाढवणे.
५. हिरवा चारा उपलब्ध असलेल्या भागात जास्तीत जास्त मुरघास तयार करण्यासाठी विशेष मोहीम.
६.पशुवैद्यकीय दवाखान्यात हायड्रोपोनिक युनिट विकसित करून कमी खर्चात हिरवा चारा निर्मितीचे प्रात्यक्षिक.
७. पशुवैद्यकीय संस्थांमार्फत अझोला बेड तयार करून पशुआहारातील वापराबाबत मार्गदर्शन.
८. सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांना कमी कालावधीत व कमी पाण्यात येणाऱ्या चारा पिकांचे बियाणे उपलब्ध करून देणे.
९. धरणे व तलावातील पाणी ओसरल्यानंतर उपलब्ध गाळपेरा क्षेत्रात चारा पेरणीचे नियोजन.
१०. पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागातून गावागावांत बैठका व मेळावे.
११.घडीपत्रिका, माहितीपत्रके, रेडिओ, डिजिटल माध्यमे, व्हॉट्सॲप ग्रुप्स आणि लघुपटांद्वारे जनजागृती.
१२महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर व पशुवैद्यकीय महाविद्यालयांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन.
१३. स्थानिक गरजांनुसार कमी खर्चातील नावीन्यपूर्ण चारा संवर्धन उपक्रम राबवून त्यांचा विस्तार.
कोणाची काय जबाबदारी?
गाव पातळी
पशुवैद्यकीय अधिकारी + सहाय्यक पशुधन विकास अधिकारी ः - प्रत्यक्ष अंमलबजावणी, पशुपालक प्रशिक्षण, प्रात्यक्षिके
तालुका पातळी
तालुका पशुसंवर्धन अधिकारी ः सर्व संस्थांमार्फत अंमलबजावणीचा नियमित आढावा
जिल्हा पातळी
जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त ः जिल्ह्याचा कृती आराखडा, प्रत्यक्ष पडताळणी
राज्य व विभाग पातळी
प्रादेशिक सहआयुक्त + सहसंचालक (पशुआहार) ः प्रगतीचे विश्लेषण, आवश्यक मार्गदर्शक सूचना
निधी ः विभागाकडील उपलब्ध निधीतून खर्चास मान्यता
-------------------------
महत्त्वाचा संदेश
‘टंचाईनंतर उपाययोजना नाही, टंचाईपूर्वीच तयारी!’
उपलब्ध चारा सुरक्षित करा → पीक अवशेष जतन करा → प्रक्रिया करा → सकस चारा तयार करा
कोट
पशुवैद्यकीय अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक गावागावांत जाऊन पशुपालकांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिके व प्रशिक्षण देणार आहेत. टंचाई निर्माण झाल्यानंतर उपाययोजना शोधण्यापेक्षा टंचाईपूर्वीच उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर करणे हेच सद्यःस्थितीत अधिक प्रासंगिक ठरेल.
- डॉ. किरण पाटील,
आयुक्त, पशुसंवर्धन आयुक्तालय
शेतकरी व पशुपालकांना आवाहन :
- अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हा
- पशुधनासाठी उपलब्ध चारा सुरक्षित करा
- शेती पिकांचे शिल्लक अवशेष जतन करा
- अवशेषांवर प्रक्रिया करा
- सकस चारा निर्मितीला प्राधान्य द्या
-------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.