Water
Water 
पुणे

चारा, पाण्याबाबत दक्ष राहा

सकाळवृत्तसेवा

पुणे - जिल्ह्यातील नागरिकांना टंचाईच्या झळा जाणवणार नाहीत यासाठी तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे. टंचाई काळात जे अधिकारी दुर्लक्ष करतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी रविवारी दिला. पिण्याच्या पाण्याचे टॅंकर, जनावरांना चारा याबाबत समन्वयाने काम करा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या.

जिल्ह्यातील टंचाईचा आढावा बैठक झाली. त्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या सूचना दिल्या. या वेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, संग्राम थोपटे, सुरेश गोरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, सहायक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुधीर जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे आदी उपस्थित होते.

पिण्याच्या पाण्याची परिस्थिती कशी आहे, चारा उपलब्धतेचे प्रमाण, नरेगांतर्गत कामाची स्थिती, उपलब्धतता याची विस्तृत माहिती या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. उपविभागीय अधिकाऱ्यांनी दर आठवड्याला गटविकास अधिकारी, तहसीलदार आणि लोकप्रतिनिधी यांची टंचाईविषयक आढावा बैठक घ्यावी, क्षेत्रीय स्तरावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊन जनतेच्या समस्या, मागण्या समजावून घ्याव्यात, त्यानुसार टॅंकरचे प्रस्ताव पाठवावेत. जिल्हाधिकारी स्तरावर टॅंकरचे प्रस्ताव तत्काळ मंजूर केले जातात, असेही ते म्हणाले. नळ पाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती करून पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न सुटत असेल, तर तसे प्रस्ताव पाठवण्यासही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

खासदार आढळराव पाटील यांनीही टंचाईनिवारणासंदर्भात उपयुक्‍त सूचना केल्या. वळसे पाटील यांनीही पाण्याचे टॅंकर, चाराटंचाई, पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती याबाबत सूचना केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

Vada Pav Girl: ना अटक झाली, ना केस.. मग वडापाव गर्लला का घेऊन गेले दिल्ली पोलीस? व्हायरल व्हिडीओमागचं सत्य

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वलसाडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

Temperature : सोलापुरात ४३.२ अंश सेल्सिअसची नोंद; पुढील दोन दिवस पुन्हा ४४ पारा

SCROLL FOR NEXT