पुणे

लोणी भापकर येथील शाळांमध्ये फॉगिंग

CD

मोरगाव, ता. १४ : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू व मलेरियाचा धोका टाळण्यासाठी लोणी भापकर येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फॉगिंग करण्यात आले. सुपर ट्रेकर्स वेल्फेअर ट्रस्ट आणि मॅजेस्टिक लँडमार्क्स यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
शाळा परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढू नये आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित शैक्षणिक वातावरण मिळावे, या उद्देशाने हे फॉगिंग करण्यात आले. मॅजेस्टिक लँडमार्क्स या कंपनीच्या सहकार्याने सुपर ट्रेकर्स वेल्फेअर ट्रस्टने यासाठी पुढाकार घेतला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी राबविलेल्या या सामाजिक उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.
या उपक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल मॅजेस्टिक लँडमार्क्सचे संचालक मनीष माहेश्वरी, संजय मेहता, राहुल मुंदडा, व्यवस्थापक अभिषेक जैन आणि गिरीराज सदानी यांचे ट्रस्टच्या वतीने आभार मानण्यात आले. ‘‘विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, याच भावनेतून हा उपक्रम राबविला,’’ अशी माहिती सुपर ट्रेकर्स वेल्फेअर ट्रस्टचे प्रवीण भापकर यांनी दिली. भविष्यातही असे सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानस ट्रस्टने व्यक्त केला आहे.

लोणी भापकर (ता. बारामती) : न्यू इंग्लिश स्कूल व जि. प. प्राथमिक शाळेत फॉगिंग करताना टीम.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uruli Kanchan Ganeshotsav security: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा प्रभावी रूट मार्च; कायदा-सुव्यवस्थेसाठी कडक तयारी

Pune Civic Tenders: महापालिकेच्या निविदांवर आयुक्तांचा लगाम; जुन्या निविदांतून वाढीव व नवीन कामांना बंदी

Pune Negligent Driving: सोरतापवाडी फाट्यावर टेम्पोच्या धडकेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; निष्काळजी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Maratha Reservation : सरकारने परवानगी नाकारली; मनोज जरांगे पाटील एकटेच सहकारीसोबत मुंबईत जाणार

Pune Civic Row: स-यादीतून बाकडे, पिशव्या खरेदीला मनसेचा कडवा विरोध; महापालिका आयुक्तांकडे निवेदन

SCROLL FOR NEXT