kidnapping sakal
पुणे

जेवणाचे बिल मागितल्याच्या रागातुन हॉटेल कामगाराचे अपहरण; पाच जणांना अटक

हॉटेलमध्ये जेवण केल्यानंर बिल मागितल्याच्या रागातुन टोळक्‍याने हॉटेलच्या कामगारास जबर मारहाण करुन त्याचे अपहरण केले.

सकाळ वृत्तसेवा

हॉटेलमध्ये जेवण केल्यानंर बिल मागितल्याच्या रागातुन टोळक्‍याने हॉटेलच्या कामगारास जबर मारहाण करुन त्याचे अपहरण केले.

पुणे - हॉटेलमध्ये जेवण केल्यानंर बिल मागितल्याच्या रागातुन टोळक्‍याने हॉटेलच्या कामगारास जबर मारहाण करुन त्याचे अपहरण केले. या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपींचा माग काढत पाच जणांना अटक केली. हि घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर मंगळवारी रात्री घडली.

योगेश सर्जेरावर पार (वय 28, रा. नगर), रवींद्र सखाहरी कानडे (वय 41), रुपेश अशोक वाडेकर (वय 38), ओंकार जालिंदर बेंद्रे (वय 32), नितीन अशोक वाडेकर (वय 32, रा.रासदर, नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. किशोर कोईराला असे जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी शारदा निलेश भिलारे (वय 38, रा. भिलारेवाडी, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भिलारे यांचे मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगद्याजवळ रानमळा नावाचे हॉटेल आहे. मंगळवारी रात्री त्यांच्या हॉटेलमधये पार, कानडे, वाडेकर, बेंद्रे हे जेवण करण्यासाठी आले होते. त्यांनी जेवण केल्यानंतर किशोर याने त्यांना जेवणाचे बिल मागितले. त्याचा राग आल्याने आरोपींनी त्यास बेदम मारहाण केली. तसेच फिर्यादी भिलारे यांनी धमकावले. "उद्या तुम्ही याच्या मरणाची खबर ऐकाल' अशी धमकी देत त्यांनी कोईरालाला आपल्या कारमध्ये जबरदस्तीने बसवून त्याचे अपहरण केले. त्यानंतर त्यास आणखी जबर मारहाण करुन काही अंतरावर सोडून देत आरोपी पसार झाले. या घटनेबाबत भिलारे यांनी तत्काळ भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी घटनेची गांभीर्याने दखल घेत आरोपींना अटक केली. भारती विद्यापीठ पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT