पुणे

अन्न प्रशासन कारवाई

CD

खाद्यतेलासह विविध पदार्थांचा १४ हजार ८५२ किलो साठा जप्त
अन्न प्रशासनाची कारवाई; अक्कलकोट, सांगोला, दक्षिण सोलापूरमधील आस्थापनांची तपासणी

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ७ : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न प्रशासनाने सोलापूर जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबविली आहे. २८ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील विविध २५ आस्थापनांची तपासणी करून अन्नपदार्थांचे ६९ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. कमी दर्जाचा संशय आल्याने ३२ लाख ५६ हजार ४०९ रुपये किमतीचा १४ हजार ८५२.६ किलो साठा जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईत खाद्यतेल, मिठाईचे पदार्थ, खवा, क्रीम, पनीर, पेढा, नमकीनचे पदार्थ आणि मसाले आदींचे नमुने घेण्यात आले आहेत. हे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, त्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
अक्कलकोट शहरातील पिरजादे प्लॉट येथील मे. रांगोली स्वीट मार्टची तपासणी करून पेढा आणि स्वीट हलवा या अन्नपदार्थांचे दोन नमुने घेण्यात आले. यावेळी कमी दर्जाचा संशय आल्याने २ लाख ५० हजार २० रुपये किमतीचा ८२९ किलो साठा जप्त करण्यात आला.
सांगोला येथील महूद रोडवरील मे. श्रीराज ॲग्रो टेकची तपासणी करून तेलाचे तीन नमुने घेण्यात आले. याठिकाणी ६ लाख २९ हजार ३६० रुपये किमतीचा ३ हजार १४६.८ किलो साठा जप्त करण्यात आला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगावमधील गावडेवाडी येथील मे. एस. जी. ट्रेडर्सची तपासणी करून तेलाचे तीन नमुने घेण्यात आले. याठिकाणी १० लाख ६० हजार ५९९ रुपये किमतीचा ६ हजार २३५.४ किलो साठा जप्त करण्यात आला.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथील मे. गणेश रामचंद्र आपटे प्रा. लि. या आस्थापनाची तपासणी करून क्रीम आणि पनीरचे चार नमुने घेण्यात आले. यावेळी ७ लाख १३ हजार ७०० रुपये किमतीचा २ हजार २१६ किलो साठा जप्त करण्यात आला.
आयुक्त तुकाराम मुंढे, पुणे विभागाचे सहआयुक्त श्रीकांत करकळे आणि सोलापूरचे सहायक आयुक्त सा. ए. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी नंदिनी हिरेमठ, रेणुका पाटील, मंगेश लवटे, गणेश कदम, कीर्तिदे देशमुख आणि उत्कर्ष एखंडे यांनी ही कारवाई केली.

कोट
- दिवाळीच्या काळात भेसळयुक्त, निकृष्ट दर्जाचे किंवा उघड्यावर ठेवलेल्या अन्नपदार्थांमुळे ग्राहकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. अन्नपदार्थांची साठवणूक, स्वच्छता, वापरले जाणारे तेल, रंग आणि इतर घटकांच्या गुणवत्तेबाबत काटेकोर तपासणी करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाकडून पुढेही अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात येणार आहे. अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील नियमांचे पालन करावे. तपासणीवेळी नियमांचे उल्लंघन आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
- साहेबराव देसाई, सहायक आयुक्त, अन्न प्रशासन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'गोकुळ'वर ताबा मिळवण्याचा प्रश्नच नाही! CM फडणवीसांनी सांगितलं संचालक नेमण्यामागचं नेमकं कारण

Maharashtra Board SSC HSC Exam Timetable 2027 : दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर! 'या' तारखेपासून होणार परिक्षा सुरु

IND vs NZ: दोन सिक्स अन् रोहित शर्माने मोडीत काढला शाहिद आफ्रिदीचा विक्रम! या खास यादीत 'हिटमॅन' नंबर-१

Trending News: ज्याने नोकरी दिली, त्याचेच 170 कोटी लुटले! महिलेचा घरातील अजब कारनामा पाहून पोलीसही चक्रावले

BAN vs WI, Test: १८४ वर ७ बाद... अन् मग तोहीद हृदोयची डबल सेंच्युरी! तिसराच सामना खेळताना बांगलादेशला दिली आघाडी

SCROLL FOR NEXT