restaurant esakal
पुणे

अन्न व्यावसायिकांना बिलावर नोंदणी क्रमांक छापणे बंधनकारक

येत्या एक ऑक्टोबरपासून सर्व अन्न व्यावसायिकांनी त्यांच्या विक्री देयकावर चौदा अंकी परवाना अथवा नोंदणी क्रमांक छापणे बंधनकारक करण्यात आले आहे.

अनिल सावळे, सकाळ वृत्तसेवा

पुणे : येत्या एक ऑक्टोबरपासून सर्व अन्न व्यावसायिकांनी त्यांच्या विक्री देयकावर चौदा अंकी परवाना अथवा नोंदणी क्रमांक छापणे बंधनकारक करण्यात आले आहे. चौदा अंकी परवाना अथवा नोंदणी क्रमांक हा त्या अन्न व्यावसायिकाची विशिष्ट ओळख दर्शवितो. परवाना अथवा नोंदणी क्रमांकावरून अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या संकेतस्थळावरुन त्या अन्न व्यावसायिकाची परवाना नोंदणीच्या वैधतेबाबत माहिती ग्राहकास मिळू शकते.

अन्न पदार्थाच्या दर्जाबाबत कोणतीही तक्रार असल्यास परवाना अथवा नोंदणी क्रमांकावरून ग्राहक अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर थेट तक्रार दाखल करू शकतो. उत्पादक, वितरक, घाऊक व किरकोळ विक्रेते तसेच उपहारगृह, रेस्टॉरंट आणि मिठाई विक्रेत्यांनी एक ऑक्टोबरपासून विक्री देयकावर परवाना अथवा नोंदणी क्रमांक छापावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त (अन्न) यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Crisis: होर्मुजमध्ये २ जहाजांवर हल्ला, युद्धाची चाहूल! भारतीय टँकर्सनी घेतला यू-टर्न; ८.३ मिलियन बॅरल तेल अडकले

फलंदाजांना धडकी भरवणाऱ्या गोलंदाजाचा मृत्यूशी संघर्ष! ICU मधील त्याची अवस्था पाहून क्रिकेट विश्वात हळहळ...

Rahul Gandhi FIR प्रकरणात मोठा ट्विस्ट! हायकोर्टाने स्वतःचाच आदेश थांबवला, नेमकं काय घडलं?

RCB vs DC Live: टीम डेव्हिडचा पराक्रम, SIX पाहून भारी होती विराटची रिअ‍ॅक्शन; पण, कृणाल पांड्या का संतापला? Video Viral

Washing Machine Safety : वॉशिंग मशीन वापरताना अजिबात करू नका 'या' 2 चुका, नाहीतर घरात शॉर्टसर्किट होऊन लागू शकते आग

SCROLL FOR NEXT