Pune-Railway-Station sakal
पुणे

Railway Station : देशभरातील सर्वच रेल्वे स्थानकातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना आता गॅस वापराला बंदी

रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर खाद्यपदार्थविक्रेत्यांना तसेच स्थानकावरील उपहारगृहांत अन्न शिजविण्यासाठी विक्रेत्यांना एलपीजी गॅसचा वापर करण्यास रेल्वे प्रशासनाने बंदी घातली आहे.

मंगेश कोळपकर (mangesh.kolapkar@esakal.com)

पुणे - रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर खाद्यपदार्थविक्रेत्यांना तसेच स्थानकावरील उपहारगृहांत अन्न शिजविण्यासाठी विक्रेत्यांना एलपीजी गॅसचा वापर करण्यास रेल्वे प्रशासनाने बंदी घातली आहे. गेल्या दोन दिवसांपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे.

देशभरातील सर्वच रेल्वे स्थानकांत अन्नपदार्थ शिजविण्यासाठी गॅसचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, प्लॅटफॉर्मवरील खाद्यपदार्थ्यांचे स्टॉल्स आणि उपहारगृहांत इलेक्ट्रिक शेगड्या वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी लांब पल्ल्याच्या आणि अन्य रेल्वेगाड्यांतही गॅसचा वापर करून खाद्यपदार्थ शिजविण्यास या पूर्वीच बंदी घालण्यात आली आहे. पुणे रेल्वे स्थानकावर ३२ स्टॉल्स आणि ५ उपहार गृहे आहेत. त्यांना रेल्वे प्रशासनाने दोन दिवसांपूवी पत्र पाठवून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.

गॅसचा वापर करून अन्नपदार्थ शिजविले गेल्यास संबंधित उपहारगृहचालक किंवा खाद्यपदार्थ विक्रेत्याचा परवाना रद्द करण्याचाही इशारा त्यात देण्यात आला आहे. त्यामुळे खाद्यपदार्थ विक्रेत्यांना आता बाहेरून खाद्यपदार्थ तयार करून ते प्रवाशांना पुरवावे लागणार आहेत.

हर्षा शहा (अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रूप) - रेल्वेगाड्यांना वारंवार उशीर होतो. त्यामुळे प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर थांबावे लागते. त्यांना खाद्यपदार्थ घ्यावे लागतात. आता नव्या निर्णयामुळे त्यांना थंड खाद्यपदार्थ मिळतील. इलेक्ट्रिक शेगडयांचा वापर प्रभावी ठरलेला नाही. त्यामुळे प्रवाशांचीच गैरसोय होणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करण्याची गरज आहे. असलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केल्यास गॅसवर बंदी घालण्याची रेल्वेवर वेळ येणार नाही. गॅसमुळे स्थानकांवर कधीही आग लागलेली नाही.

बी. के. सिंह (अतिरिक्त रेल्वे व्यवस्थापक) - नव्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्याबाबत विक्रेते, उपहारगृहचालक यांची बैठक घेऊन त्यांना पुरेशी माहिती देण्यात आली आहे. प्रवासी सुरक्षिततेला प्राधान्य देणारा हा निर्णय आहे. त्याला सर्वांनीच सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

यशचा डबल रोल, दमदार अ‍ॅक्शन अन् जबरदस्त स्टाईल; ‘Toxic’ किती भावला? पण ३ तास १४ मिनिटांचा सिनेमा करतो बोअर!

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

SCROLL FOR NEXT