for maratha reservation mashal march in katraj in support of manoj jarange patil sakal
पुणे

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी कात्रजमध्ये मशाल मोर्चा

कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भारती विद्यापीठ पोलिसांचा चोख बंदोबस्त

अशोक गव्हाणे ashokgavhane0404@gmail.com

कात्रज : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी कात्रजमध्ये बुधवारी (ता. १) सायंकाळी मशाल मोर्चा काढण्यात आला. मराठा आरक्षणासाठी विलंब करणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ कात्रज, गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडीसह संतोषनगर, सुखसागरनगर, गोकुळनगर, दत्तनगर, भारतनगर, जाधवनगर या परिसरातील नागरिकांनी मोर्चात सहभाग नोंदवला.

यामध्ये पुरुषांसह महिला व लहान मुलांचा लक्षणीय देखील सहभाग होता. मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी कात्रज व परिसरातील नागरिक एकवटल्याचे पहायला मिळाले.

कात्रज येथील पेशवे तलाव याठिकाणी असणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून व मशाली पेटवून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. कोण म्हणतंय देणारं नाय, घेतल्या शिवाय राहणार नाय! एक मराठा, लाख मराठा!

जय भवानी जय शिवाजी! जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है! अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. कात्रज तलावापासून कात्रज गावांतून पुढे कात्रज मंडईपर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी कात्रज चौकातील मंडई येथे मोर्चात सहभागी झालेल्या मराठा बांधवांनी मनोगते व्यक्त केली.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भारती विद्यापीठ पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. मोठ्या संख्येने मराठा बांधव मोर्चात सहभागी होऊनही वाहतूक पोलिसांनीही चांगल्या प्रकारे वाहतुकीचे नियोजन केल्याने वाहतूक कोंडी झाली नाही. मोर्चा शांततेत पार पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तानचं हे अती झालं! म्हणतात 'हस्तांदोलन' प्रकरणावर कारवाई करा अन्यथा UAE च्या लढतीवर बहिष्कार टाकतो...

Latest Marathi News Updates : भारतात प्रवेश करणाऱ्या 79 कैद्यांना अटक

खूपच इमोशनल... प्रेक्षकांना कसा वाटला 'लपंडाव' मालिकेचा पहिला भाग? नेटकरी म्हणतात- रुपालीऐवजी दुसरी कुणी...

Crime: अनैसर्गिक कृत्य! २ तरुणांच्या गुप्तांगावर २३ वेळा स्टेपल अन् मिरचीचा स्प्रे...; जोडप्याचा कारनामा, भयंकर कारण समोर

Crime News : नाशिकमधील बेकायदा कॉल सेंटरवर सीबीआयची धाड; यूकेतील नागरिकांना गंडा

SCROLL FOR NEXT