Bajaj Freedom sakal
पुणे

Bajaj Freedom : जगात प्रथमच बाईकला ‘सीएनजी’चा बूस्टर;नितीन गडकरींच्या हस्ते बजाज ‘फ्रिडम’चे अनावरण

‘सीएनजी’वर धावणाऱ्या जगातील पहिल्या मोटारसायकलचे शुक्रवारी केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अनावरण झाले. अशी मोटारसायकल बनविण्याचा मान ‘बजाज’ने पटकाविला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘सीएनजी’वर धावणाऱ्या जगातील पहिल्या मोटारसायकलचे शुक्रवारी केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अनावरण झाले. अशी मोटारसायकल बनविण्याचा मान ‘बजाज’ने पटकाविला आहे. १२५ सीसीची या मोटारसायकलची किंमत ९५ हजार ते १ लाख १० हजार रुपये असरणा आहे. सीएनजी व पेट्रोल अशी दोन्ही इंधनांवर धावू शकत असल्याने ती जगातील पहिली हायब्रीड ही मोटारसायकल ठरली आहे.

पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांत ही मोटारसायकल उपलब्ध असणार आहे. देशातील अन्य ठिकाणी ती उपलब्ध होण्यास याला आणखी किमान ३ महिने वाट पाहावी लागणार आहे. बजाजने या दुचाकीला ‘फ्रिडम’ असे नाव दिले आहे.

आकुर्डी येथील ‘बजाज ऑटो’च्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात या मोटारसायकलचे अनावरण झाले. या वेळी बजाज समूहाचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांच्यासह बजाज समूहाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या मोटारसायकलची इंधन टाकी अन्य मोटारसायकलींच्या तुलनेत छोटी आहे. याची सीएनजीची क्षमता २ किलो, तर पेट्रोलची क्षमता २ लिटर इतकी आहे. एक किलो सीएनजीमध्ये ही दुचाकी १०२ किलोमीटर, तर एक लिटर पेट्रोलवर ६५ किलोमीटर धावेल, असे बजाजच्या वतीने सांगण्यात आले.

दुचाकीची

  • सीट २८.९ इंच लांबीची. एवढ्या लांबीची सीट असणारी ही जगातील पहिली मोटारसायकल

  • सीएनजी टाकी १६ किलोची, क्षमता दोन किलो

  • डिस्क एलइडी, ड्रम एलइडी, आणि ड्रम असे तीन पर्याय सात रंगात उपलब्ध

एक किलो सीएनजीमध्ये १०२ किमी

एक लिटर पेट्रोलमध्ये

६५ किमी

इंधन खर्चात पाच वर्षांत

७५ हजार

रुपये बचतीचा दावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाखो लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी अपडेट, 'या' लाभार्थी महिलांचे १५०० रुपये कामयचे बंद, 'ही' चूक नडली

T20 World Cup: मुंबईत नेपाळी प्रेक्षकांचा पुन्हा झाला हिरमोड; वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात वेस्ट इंडीजचा एकतर्फी विजय

सर्वांची लाडकी शेवंता अडकली लग्नबंधनात, अपूर्वा नेमळेकरने व्हॅलेटाईन डे दिवशी बांधली लग्नगाठ, नवरा आहे तरी कोण?

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT