पुणे

वीज पडण्याची पूर्वसूचना आता देशभर

योगिराज प्रभुणे

पुणे - राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये देण्यात येणारी वीज पडण्याची पूर्वसूचना आता देशभरात मिळेल, अशी यंत्रणा उभारण्यात येत आहे. परतीच्या मॉन्सूनच्या दरम्यान या सुविधेतून देशभरात अंदाज वर्तविण्यात येण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत.

पावसाचा, थंडीचा आणि उन्हाचा अचूक अंदाज वर्तविण्याची यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. त्या पाठोपाठ आता वीज पडण्याच्या चोवीस तास आधी त्याची सूचना मिळू शकणार आहे. त्यामुळे वीज पडून होणारी जीवितहानी टळू शकणार आहे. वीज पडल्याची माहिती संकलित करणाऱ्या केंद्रांचे जाळे देशभरात उभारण्यात येत आहे, अशी माहिती भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्थेतील (आयआयटीएम) शास्त्रज्ञ डॉ. सुनील पवार यांनी ‘सकाळ’ला दिली. राज्यातील हा प्रकल्प आता देशपातळीवर घेऊन जाण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. वीज पडण्याचा अचूक अंदाज वर्तविण्यासाठी ढगांमधील विद्युत प्रवाहांची माहिती मिळणे आवश्‍यक असते. त्यासाठी केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्यातून आलेल्या माहितीचे विश्‍लेषण करून ढगांच्या गडगडाटासह पडणाऱ्या पावसाचा अंदाज, वीज पडण्याचा वेध वीस मिनिटांपासून काही तासांपर्यंत घेता येईल, अशी व्यवस्था केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

संगणक प्रणालीद्वारे मिळते माहिती
आकाशात ढग दाटून आल्यानंतर त्यात विद्युत शक्ती निर्माण होते. त्याची माहिती तातडीने संगणक प्रणालीवर समजते. विजांचा कडकडाट होत असलेल्या ठिकाणच्या नागरिकांना सतर्क करण्यासाठी फक्त २० मिनिटांचा कालावधी मिळतो. या काळात ढगांमध्ये विद्युत ऊर्जा निर्माण होऊन विजांचा कडकडाट सुरू होतो; पण पुढील भागातील लोकांना किमान तास ते दीड तास आधी याची पूर्वसूचना देता येते,’’ असेही डॉ. पवार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT