Foreign Education  sakal
पुणे

Foreign Education : अवघड झाले परदेशी शिक्षण;खर्चात २० टक्क्यांनी वाढ; डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण

कोथरूडमधील चिन्मय (नाव बदलेले आहे) अमेरिकेतील ओहियो शहरात दोन वर्षांपूर्वी शिक्षणासाठी गेला. सुरुवातीला त्याला दरमहा ५० हजार रुपये खर्च येत होता. सध्या त्याला दरमहा ५७ हजार ५०० ते ६० हजार रुपये खर्चासाठी पाठवावे लागत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोथरूडमधील चिन्मय (नाव बदलेले आहे) अमेरिकेतील ओहियो शहरात दोन वर्षांपूर्वी शिक्षणासाठी गेला. सुरुवातीला त्याला दरमहा ५० हजार रुपये खर्च येत होता. सध्या त्याला दरमहा ५७ हजार ५०० ते ६० हजार रुपये खर्चासाठी पाठवावे लागत आहेत. त्याच्या खर्चात जवळपास पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पाच वर्षांपूर्वी अमेरिकेतच शिक्षणासाठी गेलेल्या साक्षीला अद्याप नोकरी मिळालेली नाही. नवीन कोर्स करून ती तेथे थांबली आहे. पाच वर्षांपूर्वी तिला ५५ हजार रुपये दरमहा खर्च येत होता, तो सध्या एक लाख १० हजारांवर गेला आहे. एकूणच डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण वाढत चालल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. देशभरातून परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. यामुळे कुटुंबीयांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यांची ही प्राथमिक उदाहरणे.

का आला कुटुंबीयांवर ताण?

२०१९ मध्ये डॉलरचा दर ६८ रुपये होता, तर दोन वर्षांपूर्वी हाच दर सर्वसाधारणपणे ७२ रुपये होता. सध्याचा दर ८३.४५ पैशांवर गेला आहे. गेल्या दहा वर्षांत दरात २१ रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. युरो आणि पौंडच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. त्याचा आर्थिक ताण विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आला आहे. घसरणारा रुपया आणि परदेशात वाढलेले घरभाडे, पेट्रोल-डिझेलसह इतर वस्तूंच्या वाढलेल्या किमतीदेखील त्यामागे एक कारण असल्याचे चिन्मय आणि साक्षीच्या कुटुंबीयांनी सांगितले.

साडेसात लाख विद्यार्थी परदेशात

गेल्या दहा वर्षांत परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. २०१४ मध्ये ही संख्या सुमारे दोन लाख ३४ हजार होती. २०२२ मध्ये ही संख्या जवळपास साडेसात लाखांपर्यंत गेल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडील आकडेवारीवरून दिसते. विद्यार्थ्यांसाठी ज्या पालकांनी कर्ज घेतले आहे, त्यांच्या हप्त्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. ज्यांना पूर्वी तीस ते चाळीस लाख रुपये कर्ज घ्यावे लागत होते, त्यांना आता पन्नास लाखांपर्यंत कर्ज काढावे लागणार आहे. दरवर्षी खर्चात वाढच होत आहे.

खर्चात जवळपास तीन ते चारपट वाढ

अमेरिकेतील ओहियो शहर एका बाजूला आहे. कॅलिफोर्निया, न्यूयॉर्कसारख्या शहरात शिक्षणासाठी गेल्यानंतर खर्चात आणखी वाढ होते. पाच वर्षांत या शहरातील दोन खोल्यांच्या घराचे भाडे जवळपास दोन ते अडीच हजार डॉलरवर पोहोचले आहे. अशा शहरांमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थांच्या खर्चात भारतीय रुपयांच्या प्रमाणात तीन ते चारपट वाढ झाल्याचे पालक अनिल गोरे यांनी सांगितले.

पंजाब, आंध्र प्रदेश, तेलंगण, महाराष्ट्रातून सर्वाधिक

पंजाब, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि महाराष्ट्रातून दरवर्षी परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. चार राज्यांतील विद्यार्थ्यांचे प्रमाण प्रत्येकी १२.५ टक्के आहे. त्यातही अमेरिका, इंग्लंड आणि युरोपातील देशांत शिक्षणासाठी जाणाऱ्यांची संख्या अधिक असून दरवर्षी वाढत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PCMC Election: विकास फक्त शरद पवारांनीच केला, समोरासमोर चर्चेला अजितदादांचं थेट आव्हान! भाजपवर तुफान हल्लाबोल

LIC Loss : जीवन सुरक्षा देणाऱ्या LIC ची सिगारेट कंपनीत गुंतवणूक; पण बसला ११,००० कोटींचा फटका

Latest Marathi News Live Update : आम्ही आरोप केले तर अडचण होईल, भाजपचा अजितदादांना इशारा

टीकाकारांना मी त्यांच्याच... सचिन पिळगावकरांचा ट्रोलर्सवर पलटवार; चार वाक्यात विषय संपवला

Chandrapur crime News : चंद्रपूर किडनी प्रकरणातल्या आरोपीनं पोलिसांना गंडवलं, कसा दिला गुंगारा?

SCROLL FOR NEXT