Crime
Crime 
पुणे

वेश्‍याव्यवसायातून परदेशी मुलींची सुटका

सकाळ वृत्तसेवा

पुणे - स्पा व मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्‍याव्यवसायाच्या ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा घातला. त्यामध्ये चार परदेशी तरुणींची सुटका करण्यात आली, तर व्यवस्थापक महिलेस अटक करण्यात आली.

येरवडा येथील फिनिक्‍स चौकातील सहारा हॉटेलच्या वरील बाजूस असलेल्या ऑर्चिड थाई स्पा या ठिकाणी वेश्‍याव्यवसाय सुरू असल्याची खबर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने घटनास्थळी छापा घातला. विशाल जाधव व दिव्या भारती हे दोघे जण संबंधित स्पा सेंटर चालवीत असल्याची माहिती मिळाली. त्या वेळी दिव्या भारती ही व्यवस्थापक म्हणून काम पाहात होती. पोलिसांनी तिला अटक केली. त्यानंतर तेथे असलेल्या चार थायलंड येथील तरुणींची सुटका केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT