phd degree sakal
पुणे

Foreign University : परदेशी विद्यापीठांचा गोरखधंदा! पंचतारांकित हॉटेल्समध्ये मिळते पीएच. डी. पदवी

परदेशातील अनोळखी विद्यापीठ, भारदस्त नावाचा प्रबंध आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडणारे पीएच.डी. प्रदान समारंभ अलीकडे जास्तच वाढत चालले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - परदेशातील अनोळखी विद्यापीठ, भारदस्त नावाचा प्रबंध आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडणारे पीएच.डी. प्रदान समारंभ अलीकडे जास्तच वाढत चालले आहेत. बोगस वैद्यकीय डॉक्टरांप्रमाणे आता बोगस शैक्षणिक डॉक्टरांचाही गोरखधंदा जोरात असून, खऱ्या पीएचडीधारकांच्या शोकांतिकेत आता ही विकाऊ पीएचडीने भर टाकली आहे.

‘पीएचडीचा काळाबाजार’ या वृत्त मालिकेतून ‘सकाळ’ने पीएच.डी. प्रक्रियेत होणारा गैरकारभार चव्हाट्यावर आणला होता. नव्या माहितीबरोबरच पीएचडीतील गैरप्रकाराचे विकृत स्वरूप समोर येत आहे. एखादी वस्तू खरेदी

करावी, तशी आंतरराष्ट्रीय विद्यापीठांच्या नावे पीएच.डी. खरेदी करण्याचे प्रकार राज्यात मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.

खासगी पंचतारांकित हॉटेलांमध्ये पार पडणाऱ्या या पदवीदान सोहळ्यावर कुणाचा अंकुश आहे का नाही, हाच मोठा प्रश्न आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढविण्यासाठी किंवा अर्हता पूर्ण करण्यासाठी काही समाजसेवक, राजकारणी आणि शैक्षणिक क्षेत्रातील लोकांकडून अशा आंतरराष्ट्रीय विद्यापीठाकडून मानद पीएचड्या स्वीकारल्या जात आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागात याचा मोठा गाजावाजाही करण्यात येत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील या काळ्या बाजारामुळे प्रामाणिक कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होत आहे.

शैक्षणिक दर्जाचा प्रश्न...

विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) मान्यता असलेले विद्यापीठच पीएच.डी. प्रदान करू शकते. असे असतानाही ‘आंतरराष्ट्रीय विद्यापीठ’ नावाने प्रदान होणाऱ्या पीएच.डी.ला नक्की मान्यता कुणाची, पीएच.डी.साठी मार्गदर्शक कोण होते, प्रबंध नक्की कोठे सादर झाला, असे अनेक प्रश्न निरुत्तरित आहे. यावर कुणाचेच नियंत्रण नसल्याने देशातील शैक्षणिक पदव्यांच्या दर्जावर किंवा इभ्रतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

होतंय काय?

  • एखाद्या पात्रतेसाठी पीएच.डी. अनिवार्य असल्यास अशा परदेशी विद्यापीठांच्या नावे पीएच.डी. प्राप्त केली जाते

  • एकप्रकारे देशात अशा पीएच.डी. प्रदान करणाऱ्या विद्यापीठांचे मोठे रॅकेट तयार झाले आहे

  • विद्यार्थ्यांबरोबरच समाजाचीही फसवणूक होत आहे

  • बनावट पीएच.डी.चा राजरोस गैरफायदा घेतला जात आहे

मान्यताप्राप्त संस्थेलाच पीएच.डी. प्रदान करण्याचा अधिकार आहे. गरजेपोटी साधन सूचितेचे भान न ठेवता पीएच.डी. घेण्याची विकृती शिक्षण क्षेत्रात निर्माण झाली आहे. पीएच.डी.ची विश्वासार्हता जोपासण्याची जबाबदारी शासन आणि शिक्षण खात्याची आहे.

- डॉ. अरुण अडसूळ, माजी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: ट्रम्प इफेक्टमुळे सहा दिवसांनी सोनं स्वस्त! चांदीचा भावही घसरला; पाहा आजचा ताजा भाव

Bihar Laborer Killed in Sangli : मित्रानेच काढला काटा! जुन्या धामणीत नदीकाठी बिहारी मजुराचा धारदार शस्त्राने चिरला गळा; सांगलीत 72 तासांत पाचवा खून

Pune News: हिंजवडीत दूषित पाणी पिण्याची नामुष्की; सोसायट्यांमधील स्थिती, शुद्धीकरणानंतरही दुर्गंधी, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!

Who is Sameer Rizvi: वडिलांना ब्रेन हॅमरेज... CSK ची ८ कोटीची बोली अन् आता DC साठी गाजवतोय मैदान, जाणून घ्या समीरची कहाणी

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

SCROLL FOR NEXT