पुणे

वन विभागाच्या चाऱ्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची लागणार परवानगी

CD

वन विभागाचा चारा आता पशुपालकांना मिळणार; गवत लिलाव बंद
वनजमिनीवर चारा लागवडीचे नियोजन; चारा कापणी, वाहतुकीसाठी जिल्हा नियोजन समितीचा निधी

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ८ : वन विभागाच्या अखत्यारीतील चाऱ्याचा वापर आणि वितरण करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांशी विचारविनिमय करणे बंधनकारक करण्यात आले आहे. वनक्षेत्रातील गवताचा लिलाव बंद करण्यात आला आहे. त्याचा उपयोग पशुपालकांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी केला जाणार आहे. तसेच चारा उत्पादनासाठी सिंचनाची सुविधा असलेल्या वनजमिनी उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वनक्षेत्रातील गवताची कापणी, बांधणी आणि वाहतुकीसाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. चाऱ्याची तातडीने कापणी, साठवण आणि वितरण करण्यासाठी शेतकरी उत्पादक संस्था व कंपन्यांची मदत घेतली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सुचविलेल्या संस्थांमार्फतही ही कामे केली जातील.
दुष्काळी परिस्थितीत वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी चारा आणि पाण्याची उपलब्धता वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी फायर ब्लोअर खरेदी, अग्निरेषा तयार करणे, वाहने भाड्याने घेणे, नवीन बोअरवेल खोदणे आणि मातीचे बंधारे बांधणे अशा उपाययोजना केल्या जाणार आहेत. पाणथळांचे परीक्षणही करण्यात येणार आहे.
------------------------------------
चौकट
वन्यजीवांसाठी कृत्रिम पाणवठे उभारणार
वनवा रोखण्यासाठी दरवर्षी तयार करण्यात येणाऱ्या जाळपट्ट्यांच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाळपट्टे करण्यापूर्वी गवताची कापणी केली जाणार आहे. दुष्काळामुळे वाढलेली आगीची जोखीम लक्षात घेऊन अतिरिक्त अग्निप्रतिबंधक पट्ट्यांची आवश्यकताही तपासली जाईल. मानव-वन्यजीव संघर्षाशी संबंधित प्रकरणांचा प्राधान्याने निपटारा करून ती चार आठवड्यांत निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वनविकास महामंडळामार्फत वनतळी, वॉटर होल्स, टँकर्स, सोलार पंप आणि वन्यप्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठे तयार करण्यासह विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बॉस असावा तर असा! दिवाळीला प्रत्येकाला दिला १ लाखांचा बोनस, कर्मचारी भावुक; Video Viral

Mega Clean River Mission 2029 Deadline : "२०२९ आधी नदी पूर्ण स्वच्छ करूनच जनतेसमोर येणार!"; तब्बल ८,९४१ कोटींच्या मेगा प्लॅनची घोषणा, गृहमंत्र्यांचा मोठा संकल्प

Murud Accident: मुरुडवर शोककळा! भरधाव कारची स्कूटरला जोरदार धडक; शिक्षक आणि प्रसिद्ध गणेशमूर्तिकार तानाजी कुंभार यांचा जागीच मृत्यू

Latest Marathi News Live Update: : शरद पवारांच्या भेटीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या 'सिल्वर ओक'वर जाणार; रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर भेटीची मालिका सुरू

Emotional Post by Saira Banu : "दिवाळीच्या प्रकाशात एक वेगळीच जादू असते, आमची फोटो काढण्याची होती परंपरा"; पाली हिलच्या बंगल्यातील जुन्या आठवणींना उजाळा देत चाहत्यांचेही पाणावले डोळे

SCROLL FOR NEXT