Forest department arrests two poachers in Indapur trying to hunt Bengal Fox
Forest department arrests two poachers in Indapur trying to hunt Bengal Fox 
पुणे

इंदापूरात दोन शिकाऱ्यांना वनविभाकडून अटक

सचिन लोंढे ः सकाळ वृत्तसेवा

कळस : कळस (ता.इंदापूर) येथील वनातील खोकड प्राण्याची शिकार करण्याच्या उद्देशाने त्याच्या अधिवासाच्या ठिकाणी मांसाचे तुकडे ठेवून शिकारीचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली दोन आरोपी वनविभागाने आज ताब्यात घेतले. या आरोपींना इंदापूर न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी सांगितले.

ते म्हणाले, ''वनातील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आमचे सततचे प्रयत्न सुरू असतात त्या अनुषंगाने कळस परिसरात खोकड प्राण्यांचा अधिवास असलेल्या बिळाजवळ मांसाचे तुकडे ठेवण्यात आल्याचा प्रकार आढळून आला. सदर घटनेची माहिती घेऊन चौकशी केली असता, तालुक्यातील कुंभारगाव येथील दत्ता नामदेव कुंडारे व गणेश बापू भोई या आरोपींनी हा प्रकार केल्याचे उघडकीस आले. त्यांना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. शिवाय सदर ठिकाणी काही हाडं व वन्य प्राण्याचा शेपूट मिळून आल्याने ते फाॅरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठविण्यात आले.''

गेल्या काही दिवसांपासून कुंभारगाव परिसरातील अनेक जण पर्यटकांना गाईड म्हणून सेवा देत आहेत. उजनीतील पक्षी दाखवण्याबरोबर तालुक्यातील वनातील प्राणीही दाखवण्याचा बेकायदेशीर व्यवसाय करत आहेत. यासाठी वन विभागाची कसलीही परवानगी घेतली जात नाही. परंतू वनात प्रवेश करून प्राण्यांची शिकारही केली जात असल्याचे या प्रकारामुळे उघडकीस आले आहे.

उपवनसंरक्षक राहूल पाटील व सहाय्यक वनसंरक्षक आशितोष शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहूल काळे, वनपाल अशोक नरूटे, वनरक्षक पूजा काटे आदींनी ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT