पुणे

कोपरगाव वाळू तस्कर हल्ला

CD

वन विभागाच्या पथकावर वाळूतस्करांचा हल्ला

शासकीय वाहनाची तोडफोड करून ट्रॅक्टर पळविला

कोपरगाव, ता. ९ ः  तालुक्यातील कोळगावथडी येथे वाळूतस्करांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यावर हल्ला केला. शासकीय वाहनाची तोडफोड केली. वाळूचा ट्रॅक्टर पकडल्याच्या रागातून व दोन गटांतील वादातून हा हल्ला करण्यात आला. अहिल्यानगर येथील जिल्हा उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल व विभागीय वन अधिकारी डॉ. अजित साजणे (दक्षता पथक), नाशिक यांच्या आदेशानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी (संरक्षण, अतिक्रमण व निर्मूलन) दादासाहेब ठकाजी वाघुलकर (वय ४५) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

कोळगावथडी येथील गोदावरी नदीपात्रातून होणाऱ्या वन विभागाच्या राखीव वनामधून अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अहिल्यानगर येथील  वन विभागाच्या फिरत्या पथकावर समूहाने हल्ला केला. वाळू वाहतुकीचा ट्रॅक्टर पकडल्यानंतर वन कर्मचाऱ्यांचा रस्ता अडवून त्यांच्यावर लोखंडी रॉड, लाकडी काठ्या आणि कोयत्यांनी हल्ला केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. यावेळी शासकीय वाहनाची तोडफोड करून पकडलेला ट्रॅक्टर आणि त्यातील शासनाची एक ब्रास वाळू जबरदस्तीने पळवून नेल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी १४ नामनिर्दिष्ट आरोपींसह ३५ ते ४० अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लेखी ऑनलाइन अर्जाच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशाने वन विभागाचे पथक ८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११.३० वाजता कोळगाव थडी येथील वनक्षेत्र गट क्रमांक २४३ मध्ये चौकशीसाठी गेले होते. यावेळी गोदावरी नदीपात्रातून राखीव वनक्षेत्रात अवैध प्रवेश करून वाळूची साठवणूक व चोरटी वाहतूक केली जात असल्याच्या प्रकरणात ट्रॅक्टर पकडण्यात आला होता. त्यानंतर ९ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास आरोपींनी इतर अनोळखी इसमांसह वन कर्मचाऱ्यांचा रस्ता अडवून त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. शासकीय वाहनाची हत्यारांनी तोडफोड करण्यात आली. कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

 या घटनेचा तपास जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, पोलिस उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या नेतृत्वाखाली तालुका पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड व  सहायक पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDIA Bloc Vijay Chowk Protest: 'इंडिया' आघाडीचे नेते राष्ट्रपती भवनात; विजय चौकात खासदारांचे ठिय्या आंदोलन

MP OBC Reservation : मोठी बातमी! मध्य प्रदेशात 27 टक्के OBC आरक्षणाला उच्च न्यायालयाचा नकार; 14 टक्के आरक्षण कायम, रखडलेल्या 13 टक्के जागा भरण्याचेही निर्देश

CJPच्या आंदोलनापूर्वी गृह मंत्रालय अ‍ॅक्शन मोडमध्ये; नवी दिल्लीत ४ किमीच्या परिसरात इंटरनेट सेवा बंद

IMD Weather Alert : हवामानाचा मोठा उलटफेर! देशभरातील 23 राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; मॉन्सूनच्या परतीची सीमा कुठपर्यंत? महाराष्ट्रात वातावरण कसं?

Ab De Villier Hundred: ११ Six, ६ Fours! एबीच्या ४० चेंडूंत ११४ धावा; ऑस्ट्रेलियाला धुतले, २१० धावांचे लक्ष्य सहज पार केले, तोच जलवा...

SCROLL FOR NEXT