cage 
पुणे

माणसावरील हल्ल्यानंतरच वनविभागाला जाग! बिबट्याला पकडण्यासाठी लावला पिंजरा

नवनाथ भेके

निरगुडसर(पुणे) : वनविभागाचा सुस्त कारभार पुन्हा एकदा समोर आला असून ग्रामस्थांनी बिबटया पकडण्यासाठी पिंजऱ्यांची मागणी करुन देखील विविध कारणे सांगून पिंजरा लावण्यास टाळाटाळ करण्याचा प्रकार सुरु आहे. आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे परिसरात बिबटयाचा वावर वाढल्याने पिंजरा लावलाच नाही. अखेर शुक्रवारी माणसावरच हल्ला झाल्यानंतरच वनविभागाला जाग आली की, काय असा प्रश्न पडतो. कारण, त्यानंतर तातडीने घटनास्थळी बिबटयाला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील थोरांदळे, खडकी,भराडी, जवळे, नागापुर, रांजणी, वळती, शिंगवे, निरगुडसर परिसरात ऊसक्षेञ मोठया प्रमाणात असल्याने या परिसरात बिबटयाची डरकाळी वाढली आहे. ऊसाची लपण, भक्षासाठी कुञी, जनावरे, मेंढया ऊसाच्या तोंडालगतच मिळतात आणि पाण्यासाठी ओढे वाहत आहेत, घोडनदी, मीना नदीमुळे पाणी पिण्याची सोय असल्याने अशा सुखसोयी युक्त परिसरामुळे बिबटया काय परिसरातून जात नाही.

पाच हजार कोटींची अतिवृष्टीची भरपाई ! पुढील आठवड्यापासून सुरु होणार वाटप

थोरांदळे परीसरात जनावरे, कुञ्यांसह मेंढयाचा फडशा बिबटयाकडुन पाडला जात आहे,. नागरिकांनी अनेक वेळा मागणी करुन देखील वनविभागाकडून पिंजरा लावला गेला नाही आणि शुक्रवारी (ता.३०) भरदुपारी दोन वाजता बिबटयाने मेंढीवर हल्ला केला, त्यावेळी तेथे शेताला पाणी देत असलेले मनोहर फुटाणे यांनी बिबटयाला पाहून आरडाओरड केला. नंतर बिबटयानेच फुटाणे यांच्यावर डरकाळी फोडत त्यांच्यावर हल्ला केला. यात ते जखमी झाले. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यानंतर वनवविभागाने याठिकाणी तातडीने पिंजरा लावला आहे. त्यामुळे माणसावर हल्ला झाला तरच वनविभागाकडून पिंजरा लावला जातो की. काय असा प्रश्न समोर आला आहे.

माजी उपसरपंच मंगेश टेमगिरे म्हणाले की, ''थोरांदळे परिसरात बिबटयाचा वावर वाढून अनेक प्राण्यांवर हल्ले झाले याबाबत दक्षता म्हणून अनेक वेळा वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली परंतु, वनविभागाने काय पिंजरा लावला नाही, मागेही आठ महिन्यापूर्वी सुमन टेमगिरे या महिलेच्या समोरुन सायंकाळी पाच वाजता दोन शेळ्या बिबटयाने ठार केल्या त्यानंतर आताही तशाच प्रकारे दिवसा ढवळ्या बिबटयाने मेंढीसह मनोहर फुटाणे यांच्यावर हल्ला केला त्यातून ते सुदैवाने वाचले. माणसावर झालेल्या हल्ल्यानंतरच वनविभागाकडून पिंजरा लावण्यात आला.

बाळासाहेबांच्या वेळी राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत पण आता पुण्यात : संजय राऊत
 

पुणे जिल्हा ग्राहक पंचायतीचे नितिन मिंडे म्हणाले, ''थोरांदळे परिसरात बिबटयांचा दिवसाही मुक्त संचार वाढला असून पाळीवप्राण्यावर हल्ले होत आहेत आणि शुक्रवारी दुपारी तर माणसावरच झालेल्या हल्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे. वनविभागाच्या सुस्त कारभाराबाबत ग्रामस्थ संतप्त झाले असून पुढील ८ दिवसात वनविभागाने परीसरात अजुन पिंजरे लावुन बिबटयाला जेरबंद करावे अन्यथा ग्रामस्थ व आखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्यावतीने वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought: दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढणार, लोकप्रतिनिधींकडून आणखी तालुक्यांचा समावेशाच्या मागणीची शक्यता

Vaijapur Student Assault Case: गणिताचे कोडे न सुटल्याने चौथीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण

Shiv Sena Leader Death : शिंदेसेनेच्या बड्या नेत्याने उचललं टोकाचं पाऊल, शेती पिकत नसल्याने घेतला निर्णय

Latest Marathi News Live Update : मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा

ST Bus: एसटी प्रवासात NCMC कार्ड अनिवार्य; फक्त ३ दिवस बाकी, आताच करा 'हे' काम, अन्यथा सवलत रद्द

SCROLL FOR NEXT