जप्त ट्रॅक्टर सोडण्यासाठी २० हजारांची लाच
वनपाल आणि वनरक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले
ॲग्रोवन वृत्तसेवा
चंद्रपूर : कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेला ट्रॅक्टर सोडण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना वनपाल आणि वनरक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई भद्रावती येथील वनविभागाच्या कार्यालयात करण्यात आली.
या प्रकरणातील आरोपी वनपाल कोमल नरसिंगराव घुगलोत आणि वनरक्षक संदीप पुंडलिक पारवे हे भद्रावती वनविभागात कार्यरत आहेत. तक्रारदार सात जुलै रोजी घरबांधणीसाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीतून वाळूची वाहतूक करीत असताना संबंधित वनकर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर अडवून तो वनक्षेत्र सहायक कार्यालयात आणला. अवैध वाळू वाहतुकीप्रकरणी केलेल्या कारवाईची कागदपत्रे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे न पाठविण्यासाठी आणि ट्रॅक्टर सोडण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
तक्रारदाराने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करून एसीबीने भद्रावती वनविभागाच्या कार्यालयात सापळा रचला. त्यावेळी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना वनपाल घुगलोत आणि वनरक्षक पारवे यांना रंगेहात अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान व अप्पर पोलिस अधीक्षक माधुरी बावीस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक अनिल जिट्टावार, पोलिस निरीक्षक प्रशांत केदार तसेच एसीबीच्या पथकाने केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.