वृक्षारोपण sakal
पुणे

लाखणगावात सामाजिक वनीकरण अंतर्गत १५ हजार रोपांचे होणार वृक्षारोपण

ग्रामपंचायतीच्या वतीने पाच एकर क्षेत्रात तीन हजार रोपांचे वृक्षारोपण करण्यात येणार

सुदाम बिडकर ः सकाळ वृत्तसेवा

पारगाव : लाखणगाव ता. आंबेगाव येथील चारंगबाबा गायरान क्षेत्रातील एकूण ३० एकर क्षेत्रात सामाजिक वनीकरण विभाग व ग्रामपंचायतीच्या वतीने विविध प्रकारच्या झाडांच्या १५ हजार रोपांचे वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहीती सरपंच प्राजक्ता रोडे पाटील यांनी दिली. पावसाळा सुरु झाल्यानंतर सामाजिक वनीकरण विभागच्या वतीने २५ एकर क्षेत्रात सीताफळ, चिंच, कडूनिंब, करंज, मोहा, जांभूळ, शिवण, बेल, कांचन, आपटा, आवळा, शिसु, वड, बांबू, पिंपळ, आंबा आदी प्रकारच्या झाडांचे ११ हजार १११ रोपांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने पाच एकर क्षेत्रात तीन हजार रोपांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे या सर्व ३० एकर क्षेत्रात खड्डे घेण्याचे काम सुरु असून सामाजिक वनीकरण विभाग आंबेगाव च्या वनपरिक्षेत्र अधिकारी जयश्री पवार, वनपाल सारिका बुट्टे,संतोष बिराजदार,,वनमजूर सय्यद, निरगुडसरचे माजी उपसरपंच रामदास वळसे पाटील यांनी भेट देऊन पाहणी करून कामाचा आढावा घेतला यावेळी सरपंच प्राजक्ता रोडे पाटील, खरेदी विक्री संघाचे संचालक मनोजकुमार रोडे, शिरीषकुमार रोडे, संतोष टाव्हरे, लहु पडवळ, केरभाऊ गाडगे उपस्थित होते.

या सर्व रोपांची लागवड पर्जन्याच्या परिस्थिती पाहून करण्यात येईल असे जयश्री पवार यांनी सांगितले.गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली

दोन वर्षापूर्वी ग्रामपंचायतीने गवळीबाबा गायरानातील 58 एकर क्षेत्रात विविध प्रकारच्या वृक्षांच्या अडीच हजार रोपांचे वृक्षारोपन केले होते मागीलवर्षी चारंगबाबा गायरानातील वन विभागाच्या वतीने 60 एकर क्षेत्रात केशर आंबा, सिताफळ,चिंच आदी वृक्षांच्या पाच हजार रोपांचे वृक्षारोपण केले होते व यावर्षी १५ हजार रोपांचे वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे सरपंच प्राजक्ता रोडे पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी आहे का? तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय केलं होतं भाकित? खरं काय जाणून घ्या

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

Mangalevedha Basaveshwar Memorial News: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी सह्यांची लाट; एका दिवसात 1040 नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

SCROLL FOR NEXT